अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्याथ्यांची क्रीडा व कला श्रेत्रात   उत्तुंग भरारी

Khozmaster
2 Min Read
 अनुराधा इग्लिश मीडियम  स्कूलच्या  विद्यार्थ्यांनी,  पुणे क्रीडा  सेवा संचालनालय महाराष्ट्र  राज्य, पुणे , क्रीडा  परिषद  आणि जिल्हा  क्रीडा  अधिकारी  कार्यालय, जिल्हा  क्रीडा संघटना, यांच्या संयुक्त विद्यामाने  आयोजीत शालेय खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन विविध खेळांमध्ये विजय प्राप्त  केला.या कालावधीत  जिल्हा  क्रीडा  संकुल  बुलडाणा  येथे सम्पन्न झालेल्या  कराटे स्पर्धेमध्ये इयत्ता ७ वी चा गणेश पवन पांडे हा विभागिय  स्तरावरावर  निवडला  गेला आहे. तर कु.रसिका बोन्द्रे, इयत्ता ८ वी, हिने व्दितीय स्थान प्राप्त केले.हायस्कुलमध्ये जिल्हा स्तरीय शालेय सेपक टकरा या क्रीडा प्रकारात 17 वर्षाखालील मुले  भाविन खत्री , शंतनू दळवी , हार्दिक इतिवाड , प्रेम मुरकुटे, शेख उस्मान ,वेद ठोसरे , नैतिक खत्री, सारीम खान .तर 14 वर्षा खालील  मुलांनी विजय प्राप्त करुन विभागीय स्पर्धेसाठी  पात्र  झाले आहेत . व थांता आनुरा मार्शल आर्ट या शालेय स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांची विभागिय स्तरावर निवड झाली असून या सर्व विद्यार्थी वर्गाने, अनुराधा शाळेचे   नावलौकिक वाढविले  आहे. तर राज्यस्तरीय मिनी युथ व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये शाळेच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थी भूषण पांडुरंग म्हस्के याची निवड झालेली आहे. तर ऑल इंडिया ड्रॉइंग, हॅन्ड रायटिंग, व एसे रायटिंग या कॉम्पिटिशनमध्ये अनुराधा स्कूल मधील विद्यार्थी इयत्ता दहावी मधील संकेत राऊत,तर सातवी तील गौरी तळेकर, प्राथमिक वर्गातील संयोगिता सवडतकर, विराज राऊत, गार्गी काकडे या विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर, चित्रकला व निबंध स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. यामध्ये उत्कृष्ट प्राचार्य, अनुराधा स्कूलच्या जया नन्हई , उत्कृष्ट शिक्षक, अखिल पिंजारी,उत्कृष्ट शिक्षिका, जयश्री पवार यांना देखील सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले  आहे. या सर्व विजयी  व यशस्वी खेळाडू आणि सांस्कृतिक कलाक्षेत्रात यशस्वी निपुण विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंदांचे, प्राचार्यांचे संस्थेच्या मार्गदर्शक सल्लागार सुजाता कुल्ली , स्कूल कमिटीच्या अध्यक्षा  ॲडवोकेट वृषालीताई बोंद्रे यांनी अभिनंदन केले आहे. व सर्वांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती शाळेच्या वृत्त प्रतिनिधी प्रणाली डांगे यांनी दिली.
0 9 3 7 5 3
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *