S.M.S द्वारे मिळणार रेशनची माहिती प्रतिनिधी

Khozmaster
2 Min Read
स्वप्नील गणगणे
दर महिन्याला रेशन दुकानात धान्य आले की नाही याची चौकशी करण्यासाठी शिघापत्रिकांना पायपीट करावी लागते बऱ्याच वेळा धान्य येऊनही दुकानदार लाभार्थ्यांना माहिती देत नाही त्यामुळे त्यांना पहिले कामधंदे सोडून वारंवार चौकशीसाठी जावे लागते ही पायपीट आता थांबणार असून लाभार्थ्यांना थेट S.M.S द्वारे धान्य आल्याची माहिती मिळणार आहे शासकीय गोदामातून स्वस्तभाव दुकानाकडे धान्य रवाना झाल्यानंतर लगेच या दुकानाच्या परिसरातील लाभार्थ्यांना स्वस्त भाऊ दुकानाकडे धान्य आल्याचे S.M.S मोबाईलवर मिळणार आहे स्वस्तधान्य दुकाननिहाय 25 जणांना एक समूह याप्रमाणे समूह तयार करून त्यांना S.M.S   द्वारे दुकानातील अन्नधान्याची माहिती दिली जाईल यासाठी लाभार्थी शिधापत्रिकाधारकांचे मोबाईल क्रमांक नोंदणीचे शासन आदेशही जारी झाले असल्याची माहिती आहे साव वितरण मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेसोबत जोडणार ई पास मशीनद्वारे अन्नधान्याचे वितरण करताना लाभार्थ्याचे मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेसोबत जोडण्याची कारवाई करण्यात येत आहे या मोबाईल नोंदणीचे काम स्वस्त भाव दुकानदारांनी  प्राधान्याने करण्याचे आदेशही जारी झाले आहेत याशिवाय कार्यालयाने नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर अर्जात अर्जदारांकडून मोबाईल क्रमांक नमूद करून घेण्यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत संस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत शासन निर्णयन्वये पुश S, M, S ही सुविधा सी -डयक या संस्थेद्वारा विकसित करण्यात आली आहे शासकीय गोदामातून स्वस्तभाव दुकानाकडे धान्य रवाना झाल्यानंतर लगेचच त्या दुकानदाराच्या परिसरातील लाभार्थ्यांना स्वस्तभाव दुकानात धान्य आल्याचे अन्नधान्याचे S, M ,S पाठविण्याकरिता या मोबाईल  S, M ,S द्वारे कळविण्यात येणार आहे सुरक्षा योजना व एपीएल शेतकरी योजनातील लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक नोंद केल्याची प्रमाण सध्या 49% असल्याचे अहवाल द्वारे उघड झाले आहे नोंदणीचे प्रमाण वाढवीण्याची गरज असल्याचे निर्दशनात आले आहे
0 9 3 7 5 3
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *