नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे शिक्षण अधिकाऱ्यांच्या द्वारे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांना प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन…

KHOZ MASTER
3 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण तळोदा 
नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनाच्या वतीने दीर्घकालीन न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दिपकजी केसरकर यांना नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री एम व्ही कदम साहेब यांच्या द्वारे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात तील मागण्या पुढीलप्रमाणे
1. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.
2. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी .
3.शासकीय कर्मचारी प्रमाणे 10, 20, 30 वर्षाची आश्वासित निवड श्रेणीसाठीची 20% ची अट रद्द करावी.
4. वाढीव पदांना रुजू दिनांक पासून मंजुरी द्यावी व आयटी विषय अनुदानित करावा.
5. अघोषित उच्च माध्यमिक ला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कमवी विद्यालयाला प्रचलित अनुदान सूत्र तातडीने लागू करावे.
6. विना अनुदानित कडून अनुदानित मध्ये बदलीला दिनांक एक डिसेंबर पासून लागू केलेली स्थगिती तात्काळ रद्द करावी.
7. शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीचा आदेश त्वरित निर्गमित करावा तसेच विद्यार्थी हितासाठी शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी.
8. विद्यार्थी पटसंख्येचे निकष शाळा समिती संहितेनुसार असावेत.
 9. एम फिल,एम एड, पीएचडी धारक कमवी शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ करावी .
10. केंद्र शासन प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे. 11. कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतन वाढ देण्यात यावी.
12. अर्धवेळ शिक्षक पूर्ण वेळ झाल्यावर त्यांचा अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतन वाढ व इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा.या शिक्षक समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन आपण महासंघाला तातडीने चर्चेसाठी आमंत्रित कराल व मागण्यांची पूर्तता करून शिक्षकांमधील असंतोष दूर करावा अशी अपेक्षा आहे या आंदोलनाची दखल आपण न घेतल्यास व महासंघाची चर्चा करून प्रश्न निकाली न काढल्यास महासंघ या पुढील काळात परीक्षेवरील बहिष्कार, बेमुदत संप यासारखे तीव्र आंदोलन करेल व त्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक व इतर हानिस आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी, कळावे. असे निवेदनात म्हटले आहे यासह अनेक  न्याय्य मागण्या शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. नंदुरबार यांच्या मार्फत राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपक जी केसरकर यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. या निवेदना वर  जिल्हा अध्यक्ष प्रा. एस एन पाटील, सचिव प्रा. गणेश सोनवणे, कार्याध्यक्ष प्रा.उमेश पाटील उपाध्यक्ष प्रा. असिफ शहा, सहसचिव प्रा. भरत चव्हाण कोषाध्यक्ष प्रा.वाय आर गुरव, प्रसिद्धीप्रमुख प्रा सौ सुनिता कुवर, प्रा सौ गिरासे म्याडम , प्रा.आर एन ठाकरे तालुकाध्यक्ष प्रा प्रशांत बागुल, प्रा. व्ही एस वळवी, प्रा एस आर वळवी, प्रा. आर डी जाधव प्रा. सी के ठाकरे ,प्रा,वळवी व्ही एस, प्रा सोनवणे जी वाय  यांच्या सह्या आहेत व यासह प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
0 9 7 2 0 1
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *