चैन स्नॅचिंग करणारा आरोपी  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Khozmaster
5 Min Read
2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमालासह दोन गुन्हे उघड..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
नंदुरबार शहर  पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंग  चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेत असताना  स्थानिक गुन्हे शाखेने एक  सराईत गुन्हेगारांला अटक केली.या चोरट्यांकडून 30 ग्रॅम सोन्याचे  मंगळसूत्र चे दागिने  व गुन्ह्यात  वापरलेली  तीन मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. परशा उर्फ परशराम चैत्राम भिल वय 25, रा. इंद्रीहट्टी नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या  सराईत गुन्हेगारांची नाव आहे. डिसेंबर रोजी दुपारी 04.00 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील जाणता राजा चौक ते विमल हाऊसिंग सोसायटी दरम्यान, जयश्री चंपालाल चौधरी ( वय-47 रा. मातोश्री नगर, जाणता राजा चौक, नंदुरबार)  हे रस्त्याने पायी फिरत असतांना एक अनोळखी मोटार सायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या गळ्यात असलेले 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून नेले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 773/2022 भा.द.वि. कलम 392,34 प्रमाणे दिनांक 12 डिसेंबर रोजी अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल आहे.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलीस अधीक्षक  पी.आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत आदेशीत केले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी.सी.टी.व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, परंतु CCTV फुटेज अस्पष्ट व दुचाकीला नंबर नसल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती.17 डिसेंबर रोजी नंदुरबार  पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीची माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील जाणता राजा चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोराणारा इंद्रीहट्टी, नंदुरबार येथील परशा व त्याचा एक साथीदाराने मिळून केलेली असून परशा व त्याचा साथीदार त्याच्या घरी आलेला आहे.सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमखर खेडकर यांना कळवून संशयीत परशा व त्याचा साथीदार यास ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन हंद्रीहट्टी येथे रवाना केले.  पथकाने हंद्रीहट्टी गावात जावून दोन्ही आरोपीतांचा शोध घेतला असता, एका घराच्या अंगणात लिंबाच्या झाडा खाली दोन वेगवेगळ्या मोटार सायकलवर दोन इसम गप्पा करीत असतांना दिसून आले.स्थानिक गुन्हे शाखेचे
 पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच
  त्यांनी मोटार सायकल तेथेच टाकून तेथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयीत इसमास ताब्यात घेतले परंतु एक संशयीत अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. ताब्यात घेतलेला संशयीत परशा ऊर्फ परशराम चैत्राम भिल (25 वर्षे रा. इंद्रीहट्टी ता.जि. नंदुरबार )ताब्यात घेण्यात आलेला परशराम भिल यास नंदुरबार शहरातील जाणता राजा चौक येथे घडलेला गुन्हा व त्यातील मुद्देमाला बाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने व जबरीने चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र हे निजामपूर येथील एका सराफ व्यावसायीकाकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. त्याबाबत निजामपुर ता.साक्री जि. धुळे येथील सराफ व्यावसायीकाकडे विचारपूस केली असता 4 ते 5 दिवसापूर्वी परशराम भिल व त्याच्या सोबत एक अनोळखी इसम हे त्यांच्याकडे येवून त्यांना औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे खोटे सांगून अंदाजे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र त्यांच्याकडे 70,000/- रुपयांत गहाण ठेवून गेल्याचे सांगितले. त्यामुळे निजामपूर येथील सराफ व्यावसायीकाने ते सोन्याचे मंगळसुत्र पथकाकडे परत दिले.ताब्यात घेण्यात आलेला परशराम भिल यास इतर मालमत्तेविरुध्द्चे ना उघड गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता, परशराम भिल व त्याच्या साथीदाराने मिळून 7 ते 8 दिवसापूर्वी दुपारच्या वेळी नंदुरबार शहरातील डी मार्ट शॉपींग मॉल समोरील रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पॉलीश असलेली बेन्टेक्सचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून घेतले होते, परंतु हिसकावून घेतलेले मंगळसुत्र हे सोन्याचे पॉलीश असलेले बेन्टेक्स धातूचे असल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी ते फेकून दिले बाबत सविस्तर हकिगत सांगितली.त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे  गुन्हे अभिलेख पडताळणी करुन पाहिले असता उपनगर पोलीस ठाणे येथे 410/2022 भा.द.वि. कलम 393 प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.ताब्यात घेण्यात आलेला आरोपी  परशा ऊर्फ परशराम चैत्राम भिल  व गुन्ह्यातील 1,20,000/- रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व 1,60,000/- रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटार सायकली असा एकुण 2,80,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्याचे पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.तसेच गुन्ह्यातील फरार आरोपीताचा शोध घेणे साठी पथके तयार करण्यात आले असून लवकरच त्याला देखील बेड्या ठोकण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी सांगितले.ही कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, राकेश मोरे, बापु बागुल, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, विकास कापुरे,  अभय राजपुत, आनंदा मराठे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली आहे.
0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *