जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या शासकीय मुलाचे बालगृह, निरीक्षणगृह संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांचा चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दि. गुरूवार, दि. 22 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, तसेच त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व शहरातील विविध शाळांमधील मुलांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय मुलाचे बालगृह, निरीक्षणगृह शरद कला महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. 20 ते 22 डिसेंबर दरम्यान बाल महोत्सव होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्निल खट्टी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी महोत्सवातील क्रीडा, सांस्कृतिक, गीत गायन, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी बालकांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन प्रगती करावी, असे मत व्यक्त केले. श्री. खट्टी यांनी बालकांनी विविध स्पर्धेच्या युगात उत्तुंग भरारी घेऊन आपले अस्तित्व सिद्ध करावे असे सांगितले.या बाल महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.
—
Users Today : 33