प्रविण चव्हाण
नंदुरबार -: 17 ग्राम वजनाची सोन्याची पोत व , तीन हजार रुपये रोख रक्कम व रिक्षात विसरलेली पर्स महिलेला एका प्रामाणिक रिक्षा चालकाने परत मिळवून दिली आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाणे, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा चालकास संपर्क करुन महिलेला तिची पर्स व सर्व ऐवजा सहित परत मिळवून दिली आहे.
सविस्तर माहिती अशी कि , दि. 21 डिसेंबर रोजी महिला रुपाली रामचंद्र धनगर, रा – उधना, सुरत, (गुजरात) ह्या त्यांचे पतीसह नंदुरबार येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या बस स्थानक, नंदुरबार येथे उतरून बस स्थानका जवळच असलेल्या रिक्षा स्टाप वरून एका रिक्षात बसून करण चौफुली, नंदुरबार येथे गेल्या. तेथे रिक्षातून उतरल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकास भाड्याचे पैसे दिले. त्यानंतर सदर रिक्षा चालक हा तेथून निघून गेला. काही वेळातच रुपाली धनगर यांचे लक्षात आले की, त्यांच्या जवळ असलेली त्यांची पर्स व त्यामध्ये असलेले 3000/- रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ही रिक्षा मध्येच राहून गेली आहे. त्यामुळे सदर प्रवासी महिला या त्यांच्या पतीसह तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणे आल्या. त्यांनी वर प्रमाणे घडलेली हकीगत ही नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार वसंत वसावे यांना सांगितली.
त्यानंतर पोलीस हवालदार वसावे यांनी सदर बाब ही तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते यांना कळविली. त्यावर प्रतापसिंग मोहिते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे सहा. पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, पोलीस नाईक बलविंदर ईशी, स्वप्नील शिरसाठ, पोलीस शिपाई अफसर शहा अशांना तक्रारदार यांचे पती सोबत बस स्थानक, नंदुरबार येथील रिक्षा स्टापवर तपासकामी पाठविले.
त्या ठिकाणी पोलीसांनी DSK मार्केट परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली. त्याआधारे वरील नमुद महिला व तिचे पती हे ज्या रिक्षात बसले होते ती रिक्षा पोलीसांनी निष्पन्न केली.
सदर रिक्षेचा शोध घेतला असता ती रिक्षा रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आली. तेव्हा रिक्षाचे चालकास पोलीसांनी प्रवासी महिलेच्या पर्स बाबत विचारणा केली असता, रिक्षा चालकाने त्यांची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवली असल्याचे पोलीसांना कळविले. त्यानंतर रिक्षा चालकाने प्रवासी महिलेची पर्स नंदुरबार शहर पोलीस ठाणेला येवून समक्ष हजर केली.
त्या पर्सची प्रवासी महिलेने समक्ष पाहणी केल्यावर त्या मध्ये 3000/- रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण-96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांना सुस्थितीत मिळून आला.
त्यानंतर प्रवासी महिला रुपाली धनगर हिचा वरील प्रमाणे मिळून आलेले 3000/- रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण-96,000/- रुपये किंमतीचा ऐवज त्यांना सुपूर्द केला आहे.
मुद्देमाल परत करीत असतांना प्रवासी महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व तिचा वरील प्रमाणे ऐवज असलेली पर्स तिला पोलीसांनी एका तासातच परत मिळवून दिल्याने तिने पोलीसांचे मन:पूर्वक आभार मानले आहे.
त्यानंतर रिक्षा चालक देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी, रा. परदेशीपुरा, नंदुरबार यांच्या प्रामाणीक पणा बद्दल व नंदुरबार शहर पोलीस ठाणे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते, सहा. पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, पोलीस नाईक बलविंदर ईशी, स्वप्नील शिरसाठ, पोलीस शिपाई अफसर शहा यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून,
पोलीस अधीक्षक.पी.आर.पाटील यांनी सर्वांचे पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांना पुष्पगूच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.
Users Today : 47