समाजात बदल घडवून आणण्यासाठी ज्या महापुरुषांनी प्रबोधन केले, सेवा केली, दीन दुबळ्यांना सहकार्य केले त्यांचे जीवन घडावे म्हणुन सर्वस्व पणाला लावले अश्या महापुरुषांचा भावी पिढीने आदर्श घ्यावा व त्यांचे सामाजिक कार्य चिर अमर रहावे म्हणुन अशा महापुरुषांची जयंती साजरी केल्या जाते. समाजात क्रांती घडवून आणण्यासाठी व देशाच्या विकासासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे भारतीयांसाठी शिक्षणाचे दार उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारताच्या इतिहासात जे स्थान मिळाले ते स्थान ती ओळख दुर्दैवाने फातिमा शेख यांना मिळाले नाही.
महिलांना शिक्षणं मिळावे म्हणुन शाळा उघडण्यासाठी ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांना समाजातून विरोध झाला त्यावेळी पुणे शहरात एक दिलदार व्यक्ती उस्मान शेख पुढे सरसावले त्यांनी स्वतःची जागा महात्मा ज्योतिबा फुले यांना दिली इतकेच नव्हे तर आपल्या लहान बहिणीला म्हणजेच फातिमा शेख यांना सावित्रीबाई फुले यांच्या सह-शिक्षिका होण्यासाठी सहमती दिली. शैक्षणीक क्षेत्रातील अशा महान समाज सेविका फातिमा शेख यांची शासनाकडून फारसी दखल घेतल्या गेली नाही किंवा इतिहासात पण नोंद घेतली नाही. भारताच्या पहील्या मुस्लीम शिक्षिका फातिमा शेख यांची शासकीय महापुरुष जयंती यादीत पण नाव नसणे खेदाची बाब आहे. फातिमा शेख यांचे नाव शासकीय जयंती परिपत्रकात यावे व सर्व शासकीय कार्यालयात फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात यावी व त्यांचा गौरवशाली इतिहास सर्व भारतियांना कळावा म्हणुन प्रथमच दखल घेणारे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलिमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाउ साळवे यांनी दिनांक 21/12/2022 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत माननिय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.शासन परिपत्रक सन 2022 मध्ये राष्ट्रीय पुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरी करणे बाबत जे शासन परिपत्रक आहे त्या मध्ये पहील्या भारतीय शिक्षिका फितिमा शेख यांचे नाव शासन परिपत्रक मध्ये समाविष्ट करावे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात 1848 मध्ये सुरू केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आणि भारत सरकारने फातिमा शेख यांच्यावरील धडा आणि छायाचित्र 2014 मध्ये उर्दू पुस्तकामध्ये समाविष्ट केला होता. फातिमा शेख यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना शिक्षण देण्यासाठी मोठे योगदान दिले फातिमा शेख यांनी शिक्षण सोबत स्त्रियांच्या प्रश्नावर देखील काम केले अशा महान मातेचे नाव शासन परिपत्रक मध्ये नाही राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासाठी जे परिपत्रक काढले आहे त्या शासन परिपत्रक मध्ये फातिमा शेख यांचं नाव समाविष्ट करून महाराष्ट्र शासनाने मंत्रालय व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात 9 जानेवारी 2023 मध्ये फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्याचे शासन परिपत्रक 9 जानेवारी या तारखेच्या आत आदेश देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन किंवा रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने मोर्चे काढू.

Users Today : 16