समर्थ कृषी महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी  जागृती मोहीम कार्यशाळा संपन्न

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे अंमली पदार्थ विरोधी जागृती मोहीम अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी आयोजित  कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी शाळा तसेच महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थाची वाढत असलेली विक्री व अंमली पदार्थाचा महाविद्यालयातील युवकांमध्ये होत असलेला वापर व त्यामुळे विद्यार्थी जीवनावर होणारा विपरीत परिणाम यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जागरूक व्हावे तसेच अमली पदार्थावर आळा बसविण्यासाठी कारवाही करावी असे आव्हान या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले. तर प्रा. अश्विनी जाधव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत होणाऱ्या चूका विशद केल्या जसे की मित्रांच्या सांगण्यावरून किव्हा चुकीच्या जाहिराती वाचून अंमली पदार्थांना विद्यार्थी कसे बळी पडतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या मोठ्या आजाराच्या स्वाधीन करतात.
तसेच उपस्तीत  स्वयंसेवकांमधून संकेत वाघ याने आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्तीतांचे आभार प्रा. शुभम काकड  याने केले.
   या कार्यक्रमास रा. से. यो. सह कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा. लिकेश मेश्राम,प्रा मोहजीतसिंग राजपूत, प्रा. श्वेता धांडे, प्रा. सचिन गोरे, आदेश भोंगे, संकेत वाघ, ऋषिकेश मापारी, ऋतुजा मानकर , साक्षी काळे व  विद्यार्थी आणि कर्मकारी उपस्तीत होते.
0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *