भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा, ग्रामपंचायत मालगणी व युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया,बुलढाणा च्या सहकार्याने वनराई बंधारा बांधण्याचे काम दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी मालगणी नदीवरील पुलाजवळ करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालगणी ग्रा.पं.चे सरपंच प्रकाश नारायण चिंचोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे, जलसंधारण अधिकारी श्रीमती श्रध्दा मानकर, श्रीमती जागृती चौधरी, मंडळ कृषि अधिकारी धनेश मकोते, कृषि सहाय्यक व्ही.ए. चिंचोले, होते तर लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, युथवेलचे संचालक राजेश शेळके, ग्रामसेवक अंकुश बोराडे पोलिस पाटिल कैलास कड, सामाजिक कार्यकर्ते रुपेश चिेचोले,, छगन खरात, प्रदिप वाकोडे, इंजिनिअर गजानन लाटे रुपेश खरात यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या प्रसंगी झालेल्या एका छोटेखानी समारंभात तालुका कृषि अधिकारी यांनी लोकसहभागा शिवाय गावचा विकास होऊ शकत नाही श्रमदानातून बंधारे, ग्राम स्वच्छता सारख्या सामाजिक कार्यक्रमात युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर नुकत्याच जलसंधारण अधिकारी म्हणून रुजू झालेल्या श्रीमती श्रध्दा मानकर व श्रीमती जागृती चौधरी यांनी या कामा बद्दल गावकऱ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश चिंचोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे माधमातून वाहत्या पाण्यावर बांध बांधण्याचे कार्य लोकसहभागातून होणे हे कौतूकास्पद आहे. या वनराई बंधाऱ्यामुळे, गुरेढोरे, पशु पक्षी त्याच प्रमाणे शेतीसाठी सुध्दा पाण्याचा मोठयाप्रमाणत उपयोग होईल यात शंका नाही. अशा श्रमदानाच्या कार्यात युवकांनी व गावकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी, कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक उमेश बावस्कर यांनी तर आभार प्रदर्शन युथवेल चे संचालक राजेश शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल व्यवहारे, विलास सोनोने,अमर व्यवहारे, रवि जाधव, रवि राजपूत, सदानंद काकडे, विजय चिंचोले, प्रशांत चिंचोले, विनोद व्यवहारे स्वयंसेवक, अजय सपकाळ, आकाश साळोख, निवृत्ती व्यवहारे, बबन व्यवहारे, कृष्णा माळी, भरत गवई, गणेश कड इत्यादिंनी परिश्रम घेतले.
मनोरुग्णाचे कोरोना लसीकरण
बुलडाणा , आरोग्य विभाग बुलढाणा व वाय.आर.जी.केअर, यु.एस.आय.डी., जे.एस.आय., एम – राईट प्रोजेक्ट द्वारा दिव्या फौंडेशन वरवंट येथे 23 डिसेंबर 2022 रोजी अनाथ व बेघर मनोरुग्ण लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले . लसीकरण लोकांजवळ कोणतेही कागदपत्र नसल्याकारणाने एकाच आधार कार्ड व एकाच मोबाईल नंबर वर त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले, आणि तेथील 50 लोकांचे लसीकरण करण्यात आले.लसीकरण सत्र यशस्वी होण्यासाठी दिव्या फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष..अशोक काकडे आणि वाय आर जे केअर संस्थेचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.कोरोना लसीकरण कॅम्पला उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंट येथील कर्मचारी डॉक्टर गणेश गरकल (सी एच ओ) दिपाली राऊत (ए एन एम) आणि इतर काही कर्मचारी वर्ग व वाय.आर.जी.केअर संस्थेकडून नितीन डोंगरदिवे (जिल्हा प्रशासक समन्वयक) श्रीकांत बिलारी (स्टाफ ब्रदर्स ) आदि उपस्थित होते.
Users Today : 16