श्री सरस्वती विद्यालयात खरी कमाई उपक्रम उत्साहात साजरा 

Khozmaster
1 Min Read
प्रतिनीधी शिवानंद पवार देऊळगाव साकर्शा 
श्री सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय देउळगांव साकर्शा येथे दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोज शुक्रवारला भारत स्काऊट गाईड अंतर्गत “खरी कमाई” उपक्रम संपन्न झाला. यावेळी सुरुवातीला श्री सरस्वती शिक्षण समितीचे संचालक रितेशभाऊ दुगड यांच्या हस्ते फित कापून रितसर उद्घाटन झाले.यासोबतच मुख्याध्यापक खोरखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना काही सुचना दिल्या. या उपक्रमात शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त आणि उत्तुंग प्रतिसाद लाभला . जवळपास यावेळी ५० स्टॉल खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आलेले होते. सोबतच संस्था उपाध्यक्ष श्री रतनशेठ दुगड .. संचालक गोपालभाऊ लाड यांनी वेळात वेळ काढून खरी कमाई उपक्रमात सहभाग घेतला. आणि खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. श्री सरस्वती माध्यमिक व प्राथमिक आश्रम शाळेचे शिक्षक.. विद्यार्थी यांनीही यावेळी लाभ घेतला.. यावेळी श्री सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय देउळगांव साकर्शा येथील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .. या कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट टीचर श्री कोळी सर व गाईड टीचर पवार मॅडम यांनी केले.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *