देवेंद्र सिरसाट नागपूर
पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्षपदी शितल बोरकर यांची निवड करण्यात आली आहे. शितल बोरकर चा मोठा जनसंपर्क नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्रात आहे. तसेच ते सामाजिक कार्यात तत्पर असतात. तर सुचिता कोटांगले यांच्यावर पूर्व विदर्भ पीपल्स रिपब्लिकन पार्टी ची जबाबदारी दिली आहे. आणि उमरेड तालुका सचिव पदी मिताराम भोसले यांचे निवड करण्यात आली आहे.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाँग मार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली. यावेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, यावेळी नागपूर जिल्हा संघटक सुनील मेश्राम,
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते दिलीप पाटील, भिमराव कळमकर, उमरेड विधानसभा प्रभारी अभिषेक चव्हाण , रजत डेकाटे, अंकित डोंगरे यावेळी उपस्थित होते.