पाणी उपलब्धतेचा अभ्यास करुन खडक पूर्णा धरणाची उंची वाढविणार

Khozmaster
3 Min Read
उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे आ सौ श्वेता ताई महाले यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर
नागपुर
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडक पूर्णा धरणाची उंची प्रकल्प ज्या खो-यात आहे त्या खो-यातील जलसंपत्ती मालकी हक्क असलेल्या महामंडळ/मुख्य अभियंता यांची पाणी उपलब्धतेबाबत व प्रस्तावित बांधकामाविषयी सहमती आवश्यक असल्याने सहमती घेउन धरणाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर दिले. सोबतच त्याअनुषंगाने याबाबतचा सविस्तर अहवालास सहमती घेण्याची कार्यवाही प्रगतीत असल्याचे सुद्धा त्यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.आ.सौ.श्वेता ताई महाले पाटील यांच्या हिवाळी अधिवेशनासाठी 52829 क्रमांकाचा तारांकित खडकपूर्णा प्रकल्पाच्या (जि.बुलढाणा) दरवाजांना फ्लॅप लावून उंची वाढवून अतिरिक्त पाणी साठा निर्माण करणेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.बुलढाणा जिल्हयातील खडकपूर्णा नदी प्रकल्प मोठा प्रकल्प असून प्रकल्पाच्या एकूण प्रस्तावित २०७२० इतक्या सिंचन क्षेत्रामधून १६७३ इतके सिंचन क्षेत्र लाभधारकांच्या विरोधामुळे नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये रद्द करण्यात आलेले आहेत. रद्द सिंचन क्षेत्राकरीता १.३१ दलघमी पाण्याची बचत होणार आहे, तसेच या प्रकल्पाच्या दरवाजांना ०.३० मी चे फ्लॅप बसविल्यास सुमारे ९.१४६ द.ल.प.मी. अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होऊ शकतो म्हणुन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे दिनांक ५ सप्टेंबर, २०२२ रोजी लेखी निवेदनाव्दारे मागणी केली होती. उक्त मागणी आणि उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी खडक पूर्णा धरणात फ्लप बसविल्यास अतिरीक्त ९.१४६ द.ल.प.मी. पाणी साठा निर्माण होऊ शकतो ही बाब सुद्धा मान्य केली असल्याने खडक पूर्णा धरणाच्या दरवाजांना ०.३० मी चे फ्लॅप बसविण्या बाबत शासन लवकरच कार्यवाही करेल अशी आशा निर्माण झाली आहे.
खडक पूर्णाच्या दरवाजांना ०.३० मी चे फ्लॅप बसविण्यास चिखली तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आ.सौ श्वेता ताई महाले
खडक पूर्णा धरणाचे दरवाजांना ०.३० मी चे फ्लॅप मोठया प्रमाणात जल साठा वाढण्यास मदत होणार आहे. वाढलेल्या जल साठ्याचा उपयोग शेतीच्या सिंचना साठी केला जाणार आहे. या वाढलेल्या जल साठ्यामधून चिखली तालुक्यात शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी  आणि पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याअनुषंगाने खडक पूर्णा धरणासाठी पाणी उपलब्धता आणि दरवाजांना ०.३० मी चे फ्लॅप बसविण्यासाठीच्या सविस्तर अहवालास सहमती घेण्यासाठी सतत पाठ पुरावा करण्यात येणार असल्याचे ही आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *