राष्ट्रीय किसान दिनानिमित्त माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना अभिवादन

Khozmaster
2 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ता.प्रतिनिधी

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, येथे चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले, प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नितीन मेहेत्रे यांनी कृषिदूत व कृषीकन्याना संबोधित करताना शेतकऱ्याचे भारत देशाच्या प्रगती मधील महत्त्व विशद केले तसेच पूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी कशाप्रकारे सर्वांची अन्नाची गरज पूर्ण करतो याबद्दल माहिती देत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो असे देखील सांगितले. प्रसंगी प्रा मोहजितसिंग राजपूत यांनी आजच्या प्रगत युगामध्ये कृषी ज्ञान प्राप्त विद्यार्थ्यांनी आपले आद्य कर्तव्य म्हणून कृषी ज्ञानाचा प्रचार व प्रसार हा तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांमध्ये करावा जेणेकरून शेतकऱ्यांना उपलब्ध साधनातून कृषीचा विकास करणे सहज व सोपे होईल असे आवाहन केले तर प्रा सचिन सोळंकी यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित कृषी दूत अरविंद तर्फे, धनेश ताकवले, केतन घागरे, स्वराज गावंडे व कृषी कन्या गीता शिंदे, गायत्री निवाल, समीक्षा कावरे, वैष्णवी काटे यांनी शेतकऱ्यासंदर्भात कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी किसान दिनाचे प्रास्ताविक कथन करत असताना प्रा शुभम काकड यांनी सद्यस्थितीमध्ये शेतकरी करत असलेल्या शेती बद्दल थोडक्यात माहिती देऊन किसान दिन साजरा करण्यामागचा उद्देश विशद केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवचैतन्य सराफ तर उपस्थितांचे आभार सुमित गोंडुळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमास प्रा सचिन गोरे, प्रा किरण ठाकरे, प्रा श्वेता धांडे प्रा ऋतुजा जाधव, अर्चना जत्ती, सुवर्णा उमाळे महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *