आदर्श विद्यालय चिखली येथे गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read
आदर्श विद्यालयात प्रख्यात गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गणित या विषयाचे महत्त्व आणि आवड निर्माण व्हावी श्रीनिवास  रामानुजन यांच्या विषयी माहिती व्हावी या हेतूने गणित महायज्ञ संकल्पने अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यानी हजोरो गणितीय उदाहरणे सोडविले,गणित विषयाचे आकर्षक असे मॉडेल्स, भित्तिफलके, गणितीय रांगोळी, रामानुजन यांच्या विषयी माहिती तक्ते,  अशा वेगवेगळ्या माध्यमांतून या महायज्ञात सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन डायटचे प्राचार्य श्री विजय राज शिंदे तसेच श्री गजानन जी पवार सर श्री विकास जी लोखंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री समाधानजी शेळके सर उपप्राचार्य श्री प्रमोदजी ठोंबरे सर पर्यवेक्षक जाधव सर नालींदे सर व प्रमुख वक्ते श्री रामेश्वरजी कुटे सर उपस्थित होते.प्रास्ताविकेत श्री विकासजी जाधव सर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच गणित दिवस साजना करण्यामागील हेतू स्पष्ट केला.कार्यक्रमानिमित्त विविध विद्यार्थ्यांनी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या  जीवनावर भाषणे नाटिका गणितीय उखाणे गणितीय कोडी गणितीय परिपाठ घेऊन त्यामध्ये कुटप्रश्न,गणितीय रंजक गोष्टी,१०,००० पर्यंत पाढे म्हणणे, असे कार्यक्रम सादर झाले यावेळी उपप्राचार्य श्री प्रमोदजी ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात दैनंदिन जीवनात गणिताचे महत्व तसेच गणित जमले तरच जीवनाचे गणित बरोबर जमेल असा संदेश दिला.प्रमुख वक्ते ज्येष्ठ शिक्षक श्री रामेश्वरजी कुटे सर यांनी वैदिक गणित शास्त्राबद्दल माहिती दिली. या काळात वापरल्या जाणाऱ्या गणितीय संकल्पना अनेक उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पष्ट केल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री समाधानजी  शेळके यांनी गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांनी नियमित गणित विषयाचा सराव करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. कीर्ती वाघ व कु. गायत्री लाटे तर आभार प्रदर्शन गणित शिक्षक श्री सुनील तायडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व गणित शिक्षक व शिक्षक कर्मचारी बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभले.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *