बुलडाणा,
सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे रविवार, दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.दौऱ्यानुसार श्री. सावे सकाळी ११ वाजता मलकापूर येथील पांडव मंगल कार्यालयात आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताहा अंतर्गत विविध शासकीय योजनांचे शिबिरास उपस्थित राहतील.
त्यानंतर कोठारी महाविद्यालयात दुपारी १२ वाजता माळी समाजाच्या उपवर – वधू परिचय संमेलनास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १ वाजता पांडव मंगल कार्यालयात आयोजित नागरी सत्कार तसेच नवनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहतील.
Users Today : 17