मोखाडा तालुक्यातील विविध मागण्यासाठी मोखाडा उपसभापती यांचे पालघर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन 

Khozmaster
1 Min Read
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी 
डिसेंबर रोजी जिल्हा परिषद पालघर चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री भानुदास पालवे साहेब यांना मोखाडा तालुक्यातील विविध समस्या बाबत निवेदन उपसभापती श्री प्रदीप वाघ यांनी दिले,व यामध्ये कुर्लोद उपकेंद्र बांधकाम,चास,गोमघर, इत्यादी अपुर्ण नळपाणी पुरवठा योजना,सुर्यमाळ व इतर आरोग्य पथकां मधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रिक्त पदे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रिक्त पदे, जिल्हा परिषद , पंचायत समिती मधील योजनांचा लक्षांक वाढवीणे गाय गोठा अनुदान तातडीने जमा करावे अशी मागणी श्री वाघ यांनी केली.
या भेटी दरम्यान आसे ग्रामपंचायत मधील कुंभिपाडा येथील प्रत्यक्ष जावून वनराई बंधारा ला भेट दिली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आसे येथील देखभाल करण्यात आली यावेळी सभापती श्री भास्कर थेतले, गटविकास अधिकारी श्री कुलदीप जाधव, कृषी विकास अधिकारी श्री जगताप, श्री निलेश झुगरे श्री अंनता मौळे आसे सरपंच सर्व खाते प्रमुख उपस्थितीत होते.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *