साताक्लाॅज .
साताक्लाॅज येईबोले
म्हाता-याच्या वेशात
दर वर्षी नाताळात
सण रंगी परदेशात
किती काही भरलेले
असेत्याच्या पोतडीत
देत फिरतो भेट वस्तु
सानथोर सर्वां वाटीत
कुणा काय हवे सांगा
असते त्याला माहीत
लिहून असेलं ठेवीत
कुठल्याशा तो वहीत
साताक्लाॅजअसेचं ते
खूप असते भारतात
आईबाबांच्या रूपात
घरोघरी रे दिसतात
आयुष्य भर नाताळ
फक्त देतचं राहतात
साताक्लाॅज धन्य ते
किती काही साहतात
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
Users Today : 17