या गावामधील कै. शिवराम गोविंद केंझरा यांचा मुलगा कु. उत्तम शिवराम केंझरा हा आत्मा मालिक ध्यानपीठ मिलिटरी स्कुल कोकमठाम, शिर्डी या शाळेचा विध्यार्थी असून याची रूग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असता रुंबी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघा मध्ये समाविष्ट झालेला असून रग्बी इंडिया गुजरात रग्बी यांच्या संयुक्त विद्यामानाने २१/१२/२०२२ ते २२/१२/२०२२ रोजी या दरम्यान अहमदाबाद आय आय टी आय गांधीनगर गुजरात या ठिकाणी झालेल्या रग्बी खेळाची राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये २८ संघ समाविष्ट झालेले होते या स्पर्धे मधून पाचवा क्रमांक आलेला आहे. म्हणून कु. उत्तम शिवराम केंझरा याचा राहत्या घरी सत्कार करण्यात आला.
पालघर प्रतिनिधी – सौरभ कामडी विक्रमगड
पालघर जिल्ह्यामधील विक्रमगड तालुक्यातील गाव तळ्याचापाडा (वेहेलपाडा) कुमार उत्तम शिवराम केंझरा हा मुलगा येथील रहवासी असून, त्यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मावली माऊली चा कृपा आशीर्वादाने व संस्थेच्या वतीने अध्यक्ष आदरणीय मा. नंदकुमार सुर्यवंशी साहेब व सर्व ट्रश्ट् मंडळ, यांच्या मार्गदर्शनातून आत्मावलींचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर बाजी मारताहेत निवडले जाताहेत यातच शासनाच्या नामांकित योजने अंतर्गत आत्मरुप या विभागाने शिक्षण घेणाऱ्या उत्तम शिवराम केंझरा या विद्यार्थ्यांची नॅशनल साठी निवड झाली आहे.
रग्बी इंडिया गुजरात रग्बी यांच्या संयुक्त विद्यामानाने २१/१२/२०२२ ते २२/१२/२०२२ रोजी या दरम्यान अहमदाबाद आय आय टी आय गांधीनगर गुजरात या ठिकाणी रग्बी खेळाची राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेमध्ये अठाविस संघ समाविष्ट झालेले होते या स्पर्धे मधून रूंबी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघाचा पाचवा क्रमांक आलेला आहे आणि या संघा मध्ये कुमार उत्तम केंझरा याचा समवेश असून त्याचा राहत्या घरी परिवाराकडून व गावाकडून राहत्या घरी सत्कार करण्यात आला.सत्कार करत असताना त्याचे कुटुंबाने मनापासून कौतुक केले व कुमार उत्तम शिवराम केन्झरा याची बहीण कुमार अंकिता शिवराम केन्झरा यांनी थोडक्यात माहिती दिली. कुमार उत्तम शिवराम केंझरा हा अतिशय हुशार मुलगा आहे त्याला इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकत आहे असे त्याची बहीण कुमार अंकिता शिवराम केंझरा म्हणाली आणि तो महाराष्ट्र रूम्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघाकडून खेळतो म्हणून तिला खूप अभिमान वाटत आहे.
आणि पुढील माहिती कुमार उत्तम शिवराम केंझरा यांनी अशी माहिती दिली की आता पुढील सामने पुढच्या वर्षी होतील त्यासाठी मी मनापासून मेहनत घेईन आणि पुढील जे पण सामने होतील त्या मध्ये मी मनापासून खेळी करेन अशी माहिती कुमार उत्तम शिवराम केंझरा यांनी दिली.आणि म्हणून परिवार आणि गावातील ग्रामस्थ सत्कार करत असताना त्यांनी त्याचे मनानासून अभिनंदन केले.
Users Today : 17