अध्यक्षपदी तिसयांदा राहुलभाउ बोंद्रे तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ पाटील चिखली आठव्या पंचवार्षीक योजनेतील विदर्भातील पहिलीच सुरू झालेली तथा सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवित श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीची यषस्वी वाटचाल सुरू आहे. सुतगिरणीची नुकतीच संपन्न झालेली 7 वी निवडणुक अविरोध झाली असुन अध्यक्षपदी तिस-यांदा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांची तर उपाध्यक्ष पदी पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली. सुतगिरणीचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन श्री गितेषचंद्र साबळे यांनी तर सहा.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन श्री राजेंद्र काळे यांनी काम पाहीले. श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीची पार पडलेली निवडणुकी ही सलग सातव्यांदा अविरोध पाडली हे येथे उल्लेखणीय.चिखलीच्या अनुराधा नगरातील उजाड माळरानावर जवळपास 35 वर्षा पूर्वी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या कल्पक दुरदृष्टीकोनातुन श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीची उभारणी करण्यात आली. ऐकीकडे विदर्भातील सुतगिरण्या तोटयात असतांना ही सुतगिरणी मात्र कर्मयोगी तात्यासाहेबांच्या मार्गदर्षनात व माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या देखरेखीत नफयात वाटचाल करीत आहे. श्री मुंगसाजी महाराज सुगिरणीचा निवडणुक कार्यक्रमा अंतर्गत 19 आॅक्टोंब पासुन निवडणुक प्रक्रीया सुरू झाली होती. तर दिनांक 23 डिसेंबर रोजी सहकारी संस्थेच्या सर्व नवनिर्वाचीत संचालक मंडळाची विषेष सभा पार पडली. त्यात माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांची अध्यक्ष म्हणुन तर उपाध्यक्ष पदी पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली. तर यावेळी संचालक म्हणुन सर्वश्री धनपालसिंग नथ्थुसिंग चांदा, फारूकसेठ सौदागर, किषोर मोतीराम हिवरकर, राजेष जानकीराम लोखंडे, समाधान सुखदेवराव परीहार, दत्तात्रय सिताराम परसने, नंदकिषोर आनंदा षिंदे, समाधान गोविंदा सुपेकर, जगन्नाथ बाबुराव उंबरकर, अॅड.सौ.वृषाली राहुल बोंद्रे, सौ. मंदाबाई कापडसिंग जाधव, संतोष रमेष वानखेडे, दिपक पांडुरंग हाके व प्रकाष गणपत निकाळजे यांची वर्णी लागली आहे. सुगिरणीचे व्यवस्थापक विषाल मवाळ व कर्मचा-यांनी निवडणुक प्रसंगी परीश्रम घेतले.
भागधारकांच्या विष्वासावरच सुगिरणीची उत्तुंग भरारी – राहुलभाउ बोंद्रे
चिखली परीसरातील शेतक-यांची समर्थ साथ व भागधारकांनी श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीवर दर्षवीलेल्या विष्वासामुळेच सुतगिरणीची वाटचाल प्रगती पथावर व सहकारी क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी ठरत असल्याचे प्रतिपादन सुतगिरणीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी यावेळी बोलतांना केले. ते पुढे म्हणाले केंद्रातील भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोंरणामुळे एकीकडे विदर्भातील शेतक-यांषी निगडीत सहकार क्षेत्रातील उद्योग धंदे बंद पडत आहे. त्यातच जवळपास सुतगिरण्या बंद पडत असतांना चिखलीतील ही सुतगिरणी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या कुषल मार्गदर्षनात यषस्वी वाटचाल करीत आहे. शेतक-यांच्या उत्पादीत मालाला चांगले उत्पन्न म्हणजेच चांगला भाव मिळाला तरच शेतक-यांचे आर्थीक स्तर उंचावेल, शेतक-यांनी भाववाढीच्या हक्कासाठी भांडले पाहीजेत, तसेच अत्यांधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरगोस उत्पन्न घेतले पाहीजे, असे सांगुन सहकारी नविर्वाचीत उपाध्यक्ष व संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.

Users Today : 17