शहादा येथील मंदिर चोरीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणल्या बद्दल.प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार -:शहादावासीयांकडून नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील यांचा सत्कार..।।
शहादा येथील मंदिर चोरीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणल्या बद्दल.दि. 19 ते 20 डिसेंबर 2022, दरम्यान शहादा शहरातील श्री जिवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघंट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिरातील 07 दान पेट्या उचलून मंदिराच्या पाठीमागे घेवून जावून त्या पेट्यांचे कुलूप कुठल्यातरी हत्याराने तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम कोणी तरी अज्ञात चोटयाने चोरून नेले होते. त्याबाबत गणेश श्रीकृष्ण देशपांडे, ( 58, रा. जैन मंदिर दादावाडी डोंगरगाव रोड, शहादा) यांनी दिलेल्या तक्रारी वरून शहादा पोलीस ठाणे येथे गुरनं 800/2022 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शना खाली पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने अत्यंत कमी वेळेत मध्यप्रदेश सारख्या राज्यात बातमीदारांचे जाळे तयार करून आरोपी,
सुल्तान शेख रशिद शेख ( 19, रा- लाचीवाडा मोठी मशिदचे बाजुला रूम नं 3 दाहोत ता.जि. दाहोत (गुजरात)/ हल्ली मु. सनावद, टिनची ग्राउंड, ता. सनावद, जि.खरगोन मध्यप्रदेश),सुरज नवलसिंग ठाकूर, (20, धंदा-ड्रायव्हर, रा. अकोला, ता. जि. अकोला / हल्ली मु. सनावद काठीबडी. ओंकारेश्वर रोड, एसबीआय एटीएम शेजारी, ता. सनावद, जि. खरगोन मध्यप्रदेश) यांना मध्य प्रदेश राज्यात जावून बेड्या ठोकल्या आहेत.तसेच आरोपीतांकडून गुन्हयातील 81,310/- रूपये रोख रक्कम हस्तगत देखील करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील एकुण 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.शहादा शहरातील श्री. जिवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघंट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडीकोयंडा व कुलूप तोडून मंदिरातील 07 दान पेटचांचे कुलूप तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारांना नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक. किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यात जावून 24 तासातच ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला म्हणून सुघोषाघंट मंदिर ट्रस्टी, कांतीलाल टाटीया, सचिव रमेश चोरडिया, सुमतीलाल खिंवसरा. कचरु नहाटा, प्रदिप नहाटा, महेंद्र सिंवसरा, रमेश खिंवसरा, सुभाष छाजेड, मारवाडी मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मकरंद पाटील, हेमराज पवार, विनोद जैन, रमाशंकर माळी, जितेंद्र जमदाडे, मेहमूद खाटीक, मोहल्ला कमिटी सदस्य,जुबेरभाई पठाण. मेहमुद खाटीक, अन्सार शेख, रशीद शेख, बशीर शेख, नईम शेख, रफिक शेख, तापी रेसीडेन्सी सोयटी शहादा येथील. डॉ. मुकेश पाटील, रामेश्वर गगराणी, ओंकार माळी. श्री. दिपक लोहर, गजेंद्र चौधरी, निलेश पवार व जैन बांधवांसह सर्व धर्मियांनी शहरातील व्यापारी असोसीएशनचे प्रतिनिधी, विविध पक्ष कार्यकर्ते तसेच शहादा शहरातील नागरिकांनी व विविध मान्यवरांनी नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपूत, शोएब शेख यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
तसेच नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीबद्दल तसेच समाजातील विविध घटकांसाठी राबवित असलेल्या विविध सामाजीक योजना याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच नंदुरबार पोलीसांच्या पुढील वाटचालीस व कामगिरीस शुभेच्छा दिल्या.
Users Today : 17