जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे 18वी राष्ट्रीय आंतरजिल्हा मैदानी स्पर्धा निवड चाचणी बुलढाणा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन,बुलढाणा यांनी आयोजित केल्या होत्या . सदर स्पर्धेमध्ये बुलढाणा ॲथलेटिक्स क्लब बुलढाणा यांच्या खेळाडूंनी यश संपादन करुन 18वी राष्ट्रीय आंतरजिल्हा मैदानी स्पर्धेमध्ये आपले स्थान मिळवले आहे. सदर स्पर्धेमध्ये 1) 16 वर्ष वयोगटांमध्ये मध्ये 1600मीटर धावणे मध्ये कुणाल काकडे प्रथ तसेच 16 वर्ष वयोगटांमध्ये 600मीटर मध्ये आर्या दलाल प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या संघामध्ये स्थान निश्चित केले. दिनांक 12 ते 14 जानेवारी 2023 ला पटना (बिहार) येथे होणार्या स्पर्धेत हे सर्व विजेते खेळाडू बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.सर्व विजेते खेळाडूंना प्रशिक्षक श्री समाधान टेकाळे सर व श्री अनिल इंगळे सर ( राज्य क्रीडा मार्गदर्शक; मैदानी),नरसिम्हा स्पोर्टचे संचालक श्रीकृष्ण शेटे सर बुलढाणा जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री गोपाल सिंग राजपूत सर, श्री.निलेश पवार सर श्री दिपक जाधव सर,श्री गणेश जाधव सर श्री रविंद्र धामोडे सर व राज्यस्तरीय मेडल विजेती पुनम सोनोने तसेच बुलढाणा ॲथलेटिक्स क्लबचे स्वराज हसनाळे,रितेश व्यवहारे,वैभव काळवाघे,गजानन नागवे ,वैभव गवळी,प्रज्ञा सरकटे,ज्योती चव्हाण,ज्ञानेश्वरी भालके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांनी सर्व विजेते खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या💐💐
Users Today : 17