सुबोध सिरसाट ची भारतीय सैन्यात उत्तुंग भरारी

Khozmaster
2 Min Read
अकोलखेडच्या लेकाने पहिल्याच प्रयत्नात गाठले यशाचे शिखर मोलमजुरी करणाऱ्यांचा मुलगा झाला देशाचा सैनिक
प्रतिनिधी अकोट : विशाल गवई 
   
मुलगी शिकली प्रगती झाली असे म्हटल्या जाते.परंतू अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील सुबोध बाबुराव सिरसाट या युवकाने जिद्द व चिकाटीच्या बळावर पहिल्या प्रयत्नात भारतीय सैन्यात म्हणजे इंडियन आर्मी मध्ये मजल मारली आहे.सुबोध हा सुटीच्या दिवशी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायचा पण अभ्यासात देखील तो हुशार होता.सुबोध एनसीसी मध्ये असल्याने त्याला सैन्यातील ओळख झालीच तो मनावर घेतलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो मार्गक्रमण करीत आज यशाच्या शिखरावर चढला आहे.सुबोधचे वडिल बाबुराव यांचे त्याला पहिल्या पासूनच मार्गदर्शन मिळत होते की,आपण गरिब आहोत आपल्याला नोकरी पाहिजे हे त्याला नेहमी सांगत असत.बाबुराव सिरसाट व त्यांची पत्नी सुबोधची आई सुनिता देखील रात्रंदिवस शेतात मोलमजुरी करतात. मिळेल ते काम करतात.सुबोधचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण आकोलखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत झाले.तर ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण श्री.नेहरु विद्यालय येथे झाले.११ वी व १२ वी चे शिक्षण श्री.शिवाजी काॅलेज अकोट येथे कला शाखेतून झाले.सध्या सुबोध चे बी.ए व्दितीय वर्षाचे शिक्षण सुरू असतानाच कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खाजगी शिकवणी न लावता स्वतः च्या बळावर मेहनतीवर भारतीय सैन्यात सुबोध ची निवड झाली.सुबोधला दोन लहान भाऊ सुजित व नवदीप हे आहेत. त्यामुळे सुबोध हा भारतीय सैन्यात देशसेवेसाठी जाणार असल्याने आकोलखेड च्या गावकऱ्यांसह आजूबाजूच्या गावकऱ्यांना मोठा अभिमान वाटत आहे.
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *