वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये जल जीवन मिशन योजना अंतर्गत ७ कोटी पाईप लाईन योजनेचा भूमिपूजन……

Khozmaster
2 Min Read
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी 
जव्हार तालुक्यातील बहु चर्चित असलेले वावर वांगणी मधील जल जीवन मिशन योजनेचा ३ कोटी निधी मंजुरी मिळाली. असून योजनेचा २३ डिसेंबर २०२२ रोजी पाईपलाईन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले . सदर ही योजना आवेश मोदी या सुपरवायजर आणि एजन्सी ने घेतली आहे.या योजनेचा वावर वांगणी ग्रामपंचायत मधील ३ महसूल गावामधील ५००० हजार हून अधिक लोकसंख्येला फायदा होणार आहे गेल्या खूप वर्षा पासून वाघ नदी वरून वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये पाणी यावे हा प्रयत्न चालू होते.
 या अगोदर मुख्यमंत्री पेयजल योजना मधून सदर नळपाणी पुरवठा योजना करिता पाठपुरावा चालू होता परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे त्यावेळी सदर योजना मंजूर होवून टेंडर प्रोसेस ला रद्द झाली होती त्या नंतर ही पाठ पुरवा करीत सदर योजना जल जीवन योजनेतून मंजूर होवून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच वावर वांगणी ग्रामपंचायत मधील सर्व घराला पाणी मिळणार याचे समाधान आहे . या वेळी वावर वांगणी ग्रामपंचायत चे उपसरपंच रमेश बीज बोलताना याचा खास करून सागपाणी आणि रीठीपाडा या पाडे मध्ये खूप वर्षा पासून पाणी टंचाई होत असून या दोन पाड्याना खूप मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले आहे.
   यावेळी ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी सुनिल पाटील,जिल्हा परिषद सदस्य मनिषा बुधर पंचायत समिती सदस्य ज्योती बुधर,वावर वांगणी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष सरपंच मा. श्री.विनोद बुधर, मा.उपसरपंच रमेश बीज, मा. श्री.यशवंत जी बुधर साहेब,तसेच वावर वांगणी ग्रामपंचायत चे सर्व सन्माननीय सदस्य व इतर सरकारी कर्मचारी /अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत पाईपलाईनचे भूमिपूजन करण्यात आले.
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *