रितेश कुमार टीलावत हिवरखेड प्रतिनिधी
परोपकारी नागरिक समिती तसेच वेद प्रचारीनी सभा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 या चार दिवसीय इच्छा पूर्ती महायज्ञ , ऋग्वेद पारायण यज्ञाचे आयोजन हिवरखेड येथील अग्निहोत्र धाम , माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आले आहे असून दिनांक 25 डिसेंबर रोजी पासून प्रारंभ झालेल्या या महायोज्ञात हिवरखेड व परिसरातील भक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.प्रथम दिवशी संपूर्ण हिवरखेड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम स्थळी दररोज संध्याकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत वैदिक प्रवक्ता आचार्य योगेंद्र याद्निक, गुरुकुल नर्मदा पुरम यांचे व्याख्यान व भजन होत आहे..
हिवरखेड परोपकारी नागरिक समिती व वेध प्रचारिणी सभा नागपूर द्वारा आयोजित इच्छापूर्ती महायज्ञ , ऋग्वेद पारायण यज्ञ हा यज्ञ पूर्ण भारतातील सर्वात मोठा यज्ञ असून संपूर्ण विदर्भात सर्वप्रथम हिवरखेड येथे संपन्न होत असल्याने परिसरातील नागरिकांचे सौभाग्य आहे की सदरहू यज्ञ हा एवढ्या छोट्या गावात प्रथमताच होत आहे. सदरहू यज्ञात धर्मप्रेमी नागरिक व भक्त या यज्ञात यजमान रुपी , किंवा आहुती देण्याकरिता भरपूर संख्येने उपस्थित राहत असून या यज्ञास परिसरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मनोगत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
इच्छापूर्ती महायज्ञ व ऋग्वेद पारायण यज्ञाची पूर्णाहुंती दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.
Users Today : 18