ग्रामपंचायत बेलुरावर प्रगती पॅनलचे वर्चस्व

Khozmaster
2 Min Read

विकासाच्या मुद्दयावर पुन्हा सरपंचपद काबीज अकोट प्रतिनिधी विशाल गवई 

अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत बेलुरावर पुन्हा एकदा राम पाटील मंगळे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, अटीतटीच्या लढतीत ग्रामपंचायत बेलुरावर सत्ता काबीज केली आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायत बेलुरा येथील निवडणूक मंगळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.
पहिल्या पाच वर्षांत सत्तेत असतांना त्यांनी गाव विकासासाठी निधी खेचून आणला होता. महाविकास आघाडीच्या काळात प्रहार संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना गावात विकासाची गंगा वाहली. या निवडणुकीत सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यांनी पत्नी दीपिका यांना सरपंच उमेदवार म्हणून उभे केले होते. मनमिळाऊ स्वभाव, दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा बेलुरावासीयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत मोठ्या मताधिक्याने दीपिका मंगळे यांना निवडून दिल्याने बेलुरा
गावात आनंदाचे वातावरण आहे. बेलुरा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात असून, राम पाटील मंगळे यांच्या प्रगती पॅनलने सरपंचासह पाच जागेवर……
मला मिळालेली संधी ही नक्कीच सार्थकी लावत अधिकाधिक कामे मार्गी लावण्यात येतील, तसेच गावातील सुजान नागरिकांच्या मार्फत लक्षवेधी प्रश्न सोडवण्यासाठी असलेल्या संकल्पना ग्रामपंचायतपर्यंत पोहचवाव्या, असे आवाहन करते. जेणेकरून गावातील शेवटच्या घटकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचून कार्य करता येईल.दीपिका मंगळे, नवनिर्वाचित सरपंच, बेलुरा.विजय मिळविला. यामध्ये सरपंचपदी दीपिका मंगळे, सदस्य म्हणून ऋषिकेश साबळे, दुर्गा भोरे, अनुपमा पचांग (अविरोध), हरिराम सोळंके, अशा पाच जागेवर प्रगती पॅनलने विजयश्री मिळविला, त्यामुळे स्पष्ट बहुमत असल्यामुळे उपसरपंच सुद्धा त्यांच्याच पॅनलचा होईल. विकासाच्या मुद्द्यावर लढलेल्या या निवडणुकीत बेलुरावासीयांनी परत एकदा प्रगती पॅनलच्या हाती ग्रामपंचायतची सत्ता दिली
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *