समर्थ कृषी महाविद्यालयात शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्साहात

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा आयोजीत शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती साजराकरण्यात आली.या प्रसंगी महाविद्यालयात आयोजित  कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली याप्रसंगी प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांचे कृषी शिक्षण क्षेत्रातील योगदान, जागतिक कृषी मेळाव्याचे आयोजन, होतकरू तरुणांना शिक्षित होण्यासाठी केलेली मदत तसेच दिनदलितांच्या उद्धारासाठी केलेले यशस्वी प्रयत्न याविषयी माहिती दिली. त्यानंतर प्राध्यापक सचिन सोलंकी यांनी भाऊसाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. तसेच प्रा. नारायण बोडखे यांनी भाऊसाहेबांच्या सामाजिक, राजकीय तथा कृषी कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित कृषी दूत आयुष्य येलने,आदित्य ठाकरे, राम उबाळे, आकाश गीखे,योगेश गीते, तसेच कृषी कन्या साक्षी भालाधरे, दिपाली मोरे, वैष्णवी गोळे व हेमलता खुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री शिंगणे आणि ऋतुजा वाघ व उपस्थितांचे आभार ऋतुजा बनकर यांनी केले.
    या कार्यक्रमास रा. से. यो. सह. कार्यक्रम अधिकारी  प्रा. किरण ठाकरे, प्रा. लिकेश मेश्राम, प्रा. विजय पवार, प्रा. वैभव देशमुख, प्रा. चारुदत्त जयभाये, प्रा. श्वेता धांडे , प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. शिवकन्या दरेकर, अर्चना जत्ती, सुवर्णा उमाळे, व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होेते.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *