नंदूरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाची निवडणूक बिनविरोध

KHOZ MASTER
1 Min Read
अध्यक्षपदी चंद्रकांत रघुवंशी,सचिव युवराज पाटील, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील तर राज्य प्रतिनिधीपदी राजेंद्र गावित.
प्रविण चव्हाण
नंदुरबार :-जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून,त्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयात बुधवारी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.शैक्षणिक क्षेत्रात कुठलेही राजकारण येऊ नये यासाठी निवडणुकीची प्रक्रिया बिनविरोध घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.
 त्यात जिल्हाध्यक्षपदी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, सचिव युवराज पाटील,कार्याध्यक्ष अभिजीत पाटील,उपाध्यक्ष  उर्मिला गावित,चेतनकुमार पवार,नागेश पाडवी तर सहसचिवपदी संजय जाधव, खजिनदार भास्कर पाटील,राज्य प्रतिनिधी राजेंद्र गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणी याप्रमाणे-:
 पदसिद्ध सदस्य श्रीपत पाटील,डॉ.निंबा नांद्रे, प्रा.डॉ रवींद्र चौधरी,युवराज पाटील,डॉ सुहास नटावदकर,गुलाब महाजन, अनिता पाटील,मो.हनीफ उमर,प्रा.लियाकत सैय्यद,प्रकाश पाटील,प्रा.जे.टी पवार,गंगाजी कोकणी
याप्रमाणे तालुकाध्यक्ष
नंदुरबार- जितेंद्र पाटील
शहादा-गणेश पाटील
नवापूर-अनिल पाटील
 अक्कलकुवा- आशा पाडवी
तळोदा- विद्यादेवी तांबोळी धडगाव- निमेश पवार.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *