नेट- सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीचे 8 जानेवारीला औरंगाबाद येथे विभागीय अधिवेशन

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी रवि मगर
‘नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य’ चे विभागीय अधिवेशन दि. 8 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे होणार असल्याची माहिती नेट- सेट,पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नेट सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षापासून नेट सेट पीएच.डी धारकांच्या विविध प्रश्न आणि भरती संदर्भात शासना शी संघर्ष करीत आहे. या समितीच्या वतीने राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे,असहकार,चर्चा करण्यात आले आहेत. त्याला काही प्रमाणात यश सुद्धा आले आहे.
अशा या नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीचे यंदाचे विभागीय अधिवेशन औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. हे अधिवेशन दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठिक 11 वाजता सुरू होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र औरंगाबाद या इमारतीमध्ये हे अधिवेशन पार पडेल. नेट- सेट, पीएचडी धारक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहसंचालक विभाग समन्वय समिती औरंगाबाद आणि नेट- सेट, पीएचडी धारक संघर्ष समिती औरंगाबाद विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.या अधिवेशनात ची जय्यत तयारी नेट सेट एचडी धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ.परमेश्वर पौळ, डॉ. प्रमोद तांबे, प्रा.सुरेश देवडे- पाटील, डॉ.विश्वास देशमुख, डॉ. कांचन जोशी यांच्या माध्यमातून  पदाधिकारी, सदस्य करत आहेत, अशी माहिती राज्य समन्वय समितीचे सदस्य  डॉ. रमेश वाघमारे डॉ. अमोल मस्के  डॉ. गणेश नागरे प्रा.एस.एन लोणकर डॉ. संतोष जाधव  विकास गवई यांनी आज येथे दिली.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *