तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण प्रशालेचे घवघवीत यश

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी/ सुरज आबाचने
एकुरगा (ता. उमरगा) येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण प्रशाला, माडजच्या खेळाडूंनी घवघवीत असे यश संपादन केले. या यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक रामजी सोळुंके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दिगंबर फुगटे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
विश्वजीत बालाजी शिंदे –  ८००मि. धावणे प्रथम व ४०० मि. द्वितीय (१७ वयोगट)
भक्ती माधव गायकवाड – ८०० मि. धावणे प्रथम (१७ वयोगट)
शितल बालाजी शिंदे – ६०० मि. धावणे प्रथम (१४ वयोगट)
अजय माधव काळे – १५०० मि. धावणे प्रथम (१७ वयोगट)
समीधा अविनाश शिंदे – ६०० मि. धावणे द्वितीय (१४ वयोगट)
नंदकिशोर अंकुश शिंदे – २०० मि. धावणे द्वितीय (१४ वयोगट)
रीले ४×४०० मि. धावणे प्रथम – समृद्धी नेताजी बनसोडे, भक्ती माधव गायकवाड, आदिती नंदकुमार काळे, साक्षी सचिन गिरी (१९ वयोगट)
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *