नंदुरबार पोलीसांची निराधारांना माणुसकीची  उब, ब्लॅंकेट वाटप करुन नववर्ष केले साजरे !!

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार 
अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करीत असताना नंदुरबार पोलीसांनी वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे. नविन वर्षाचे स्वागतानिमित्त कोठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांकडून बंदोबस्त लावण्यात येतो. नंदुरबार पोलीसांनीही दि.३० व ३१ डिसेंबर रोजी दिवसा व रात्री नाकाबंदी व गस्तीचा बंदोबस्त लावला होता. स्वतः पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचेसह बहुतांशी अधिकारी रस्त्यावर होते. सध्या जिल्ह्यात कडाक्याची थंडी असल्याने जागोजागी रस्त्याच्या कडेला, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन या ठिकाणी गरीब, निराधार, फिरस्ते व भिक्षुक थंडीत कुडकुडत उघड्यावर झोपल्याचे गस्तीवरील पोलीस अधीक्षक यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपले सहकाऱ्यांशी सल्लामसलत करुन काही सामाजिक संस्थांच्या मदतीने ब्लॅंकेट उपलब्ध केल्या. जिल्हाभरात शेकडो गरीब व निराधारांच्या अंगावर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्या स्वतःच्या हातांनी पांघरल्या.अशा अनोख्या पद्धतीने नंदुरबार पोलीसांनी नविन वर्षाचे स्वागत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.  दरवर्षी हिवाळयात थंडीने मृत्यू पावणारांची संख्या मोठी आहे.अशा वेळी पोलीसांना दुःखी मनाने मृतदेहाचे पंचनामे करावे लागतात त्यापेक्षा गरुजूंना पांघरुन देऊन हे पुण्याचे काम करताना आनंद व समाधान वाटल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांनी सांगितले.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *