नवजात अर्भका बाबत आवाहन

KHOZ MASTER
1 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी नदीच्या पात्रात 13 डिसेंबर,2022 रोजी 1 दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले आहे. या अर्भकावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यु.पी.पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सदर स्त्री जातीचे अर्भक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह बाल कल्याण समिती अध्यक्ष (9307143016), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार (02564-210047)  तसेच चाईल्ड लाईन (1098) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (9421477143 ) वर संपर्क साधुन सदर अर्भकांस दहा दिवसाच्या आत ताब्यात घ्यावे. अन्यथा सदर अर्भकांस शिशुगृहात दाखल करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी.पाडवी यांनी कळविले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *