उदयनगर येथे शहाजी राजे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन

Khozmaster
2 Min Read
 उदयनगर , प्रतिनिधी रफीक खान
शहाजीराजे माध्य.व उच्च माध्य.विद्यालय, द्वारकाबाई खेडेकर प्रा.शाळा,जिजाऊ कॉन्व्हेंट,  यांच्या विद्यमाने  उदयनगर येथे दिनांक 01/01/2022 ला वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यामध्ये दिनांक 29 ते 31 डिसेंबर क्रिडा स्पर्धा व साहित्यिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.  त्यां मधे संगीत खुर्ची स्पर्दे मधे वर्ग तीसरी चा विद्यार्थी कामरान खान रफीक खान याने प्रथम क्रमांक प्राप्त करून शाड़े चे प्राचार्य अनंतरावजी चेके सर व मान्येवरा चे हस्ते गोल्ड मैडल व प्रमाण पत्र देन्यात आले    तर दिनांक 01जानेवारी 2023 ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, (संस्थापक अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ संस्था) व मा.आ. रेखाताई खेडेकर ,(सचिव राष्ट्रमाता जिजाऊ संस्था) तर प्रमुख उपस्थिती म्हणून संचालक मा.अशोकरावजी देशमुख,कोषाध्यक्ष मा.पंडितरावजी देशमुख,उदयनगर चे नवनिर्वाचित सरपंच मा. मनोजभाऊ लाहुडकार,केंद्रप्रमुख मा.ठेंग सर हे होते.या कार्यक्रमात मा.अनंता चेके सर,प्राचार्य शहाजीराजे विद्यालय,उदयनगर यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटिका, लावणी,वेशभूषा इत्यादी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. सर्व विद्यार्थ्यांचे मा.अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब व मा.आ.रेखाताई खेडेकर यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे संचलन स्मितल देशमुख मॅडम,ज्ञानेश्वर अवचार सर, सुरेखा झिने मॅडम,शैला सवडतकर मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर अवचार यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,शहाजीराजे माध्य. व उच्च माध्य. विद्यालय,द्वारकाबाई खेडेकर प्राथमिक शाळा, जिजाऊ बाल संस्कार केंद्र उदयनगर यांनी मोलाचे योगदान दिले.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *