विदर्भ पब्लिक स्कूल सावित्रीबाई फुले समस्त स्त्रियांचे ऊर्जास्रोत

Khozmaster
2 Min Read
श्रीमती विद्या काळे यांचे प्रतिपादन
मालेगांव
स्त्रियांच्या शिक्षण प्रणेत्या विद्येची जननी, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवण्याऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई यांची जयंती अर्थात  बालिका तथा म्हणून विदर्भ पब्लिक स्कूल मध्ये साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या संचालिका विद्या काळे यांनी असे प्रतिपादन केले. सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट अभिनयाच्या माध्यमातून शाळेतील मुलींनी साकारला सावित्री बाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे त्याग याची आठवण मुलींना करून दिली.  स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना कठीण प्रसंगी खचून न जाता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन सतत प्रगतीपथावर जाण्याची आवाहन केले. आठवीचा विद्यार्थी हर्षल खरात आणि आर्यवर्धन बळी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तसेच शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी अक्षता लादे, रसिका पिंपरकर, भक्ती आढाव आणि युक्ती राठोड यांनी अभिनयातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. सदरील जीवनपटातून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी भारतीय समाज उत्थानासाठी, विशेष करून स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचे वर्णन करण्यात आले. फुले यांची साहित्य संपदा , महामारी आणि प्लेग दरम्यान केलेले समाज उपयोगी कार्य यांची विस्तृत माहिती देण्यात आली. सदरील जीवनपटाचे दिग्दर्शन शिक्षक प्रसाद लेमाडे यांनी केले तर तांत्रिक सहकार्य मयुरी वर्मा, पुरुषोत्तम इंगळे, धनंजय चव्हाण, शुभम मोहोळे आणि अमोल कराळे यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य सतीश मालाकार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक वृंदानी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी विदर्भ पब्लिक स्कूल च्या प्रांगण मध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती होते.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *