1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार
भारत निवडणूक आयोगाकडील  14 जुलै, 2022 रोजीच्या पत्रानुसार  1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम घोषित केला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदार याद्या अदयावत करण्यासाठी खुल्या राहतील, अशी तरतूद आहे.तथापि, भारत निवडणूक आयोगाकडील दि. 03 जानेवारी, 2023 रोजीच्या पत्रातील मागदर्शक सुचनांप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या 10 दिवसापुर्वी पदवीधर मतदार नोंदणीकरिता प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करता येईल, असे कळविण्यात आले आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2022-23 करिता नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 12 जानेवारी, 2023 आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भीय पत्रातील सुचनांप्रमाणे नाशिक विभाग पदवीधर मतदार नोंदणीकरिता प्राप्त पदवीधर मतदार नोंदणी अर्जावर कार्यवाही करुन मतदार यादी अद्यावत करण्यात येईल, असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.
0 9 4 6 8 9
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *