तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारे आयोजित निवासी विशेष शिबिराची सुरुवात तालुक्यातील दत्तक ग्राम खल्याळ गव्हाण येथे करण्यात आली हे विशेष शिबिर दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खल्याळ गव्हाण येथे पार पडणार आहे. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले तथा डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित रासेयो स्वयंसेवकांना संबोधित करताना देवानंद कायंदे यांनी जे स्वयंसेवक या शिबिरामध्ये सहभागी आहे त्यांनी ग्रामस्थांमध्ये जाऊन त्यांच्याबद्दल माहिती घेऊन आपल्या कृषी ज्ञानाचा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कशाप्रकारे उपयोग केला जाईल याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ग्रामस्थ महिलांमध्ये कृषी ज्ञानातून काढणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येक महिलेला व्हावी या दृष्टीने कार्य करावे असे आवाहन केले. तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले युवा उद्योजक सुजित गुप्ता यांनी स्वयंसेवकांनी शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःमधील गुण ओळखून उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करावी आणि ह्या वाटचालीसाठी रासेयो निवासी शिबिर विशेष लाभदायी ठरते असे सांगितले. महाविद्यालयाकडून आयोजित राष्ट्रीय निवासी विशेष शिबिराच्या प्रास्ताविकेत रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा शुभम काकड यांनी हायटेक शेती, कृषी योजनांची ग्रामस्थांपर्यंत माहिती, महिला सक्षमीकरण, ग्राम स्वच्छता व कृषी संलग्न विविध उद्योग याबद्दल ग्रामस्थांमध्ये जागृती करणार आहोत असे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक धनेश ताकवाले तर उपस्थितांचे आभार वैष्णवी काटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास पत्रकार मुशीर कोटकर, ग्राम खल्याळ गव्हाण येथील सरपंच सौ कविता बद्रीनाथ दंदाले, उप सरपंच सौ शितल विनोद खंडागळे, शाळा समिती अध्यक्ष रामदास दंदाले, तंटामुक्ती अध्यक्ष दगडुबा शेळके, जि. प. शाळा मुख्याध्यापक दिनकर कायंदे, ग्रामपंचायत सदस्य सौ कौशल्या अशोक दंदाले, अर्जुन गायकवाड, सौ निर्मला शंकर डोंगरे, ग्रामपंचायत सचिव कविता चेके, प्रा मोहजीतसिंग राजपूत, प्रा विलास सातपुते, प्रा लिकेश मेश्राम, प्रा सचिन सोळंकी, प्रा देवानंद नागरे, प्रा श्वेता धांडे व स्वयंसेवक उपस्थित होते.
Users Today : 20