पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन

Khozmaster
1 Min Read
आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001-2015 प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीत साजरा केला जाणारा ६ जानेवारीचा पत्रकार दिन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे साजरा करण्यात येणार आहे. हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने जुने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह मलकापूर येथे पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ६ जानेवारी रोजी  संध्याकाळी ६.०० वाजता जुने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह मलकापूर येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजातील सत्य शोधून निष्पक्ष, निर्भिड व सजगपणे जनतेसमोर मांडण्याचा वसा घेऊन पत्रकारीतेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या वृत्तपत्र संपादकांना व पत्रकारांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिनी *राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्याचे* आयोजन करण्यात आले असून या सोहळयाला  प्रमुख अतिथी म्हणून मलकापूर नांदुरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश एकडे,  राजेश सुरडकर तहसीलदार मलकापूर,  विजयसिंह राजपूत ठाणेदार मलकापूर शहर, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *