सावरगाव मुंढे-रामप्रसाद सुरुशे प्रतिनिधी- जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सावरगाव मुंढे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक श्री समाधान मुंडे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापक श्री समाधान मुंडे सर यांनी सावित्रीबाई फुले विषयी विचार व्यक्त केले सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य हे अतिशय प्रेरणादायी असून आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मुली शाळेत दिसतात. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विचार व्यक्त केले. वर्ग सातवी चा विद्यार्थी गिरिधर रामप्रसाद सुरुशे यांनी सुद्धा विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जोशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दत्तराव मुंढे सर यांनी केले सर्व विद्यार्थी मिळून कार्यक्रम यशस्वी केला.
Users Today : 0