शहीद योगेश दराडे यांच्या स्मृतित कॅन्डल मार्च व शहीद  कीर्तन

Khozmaster
2 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
लोणार सरोवर व मातृ तीर्थाच्या मध्य सीमेवर मांडवा गावचे सुपुत्र 30 डिसेंबर 14 ला जगातील सर्वात उंच हिमशिखर शियाचीन च्या युद्धभूमीवर शहीद झालेले  योगेश दिनकरराव दराडे 3 जानेवारी वीर पुत्र आर्यन च्या वाढदिवसाच्या दिवशीच चिताग्नी दिला होता हे चित्र पाहून जमलेला अथांग जनसागर समुदाय अश्रू धारांनी नाहून निघाला  योगेश चे कर्तव्य आदम्य शक्ती हे राष्ट्र कधीही विसरणार नाही  मराठा रेजिमेंट चा हा जवान हे कंकण करी बांधियले जनसेवेसाठी दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायला हो
व ही सिद्धता व बलिदानाची परिसीमा मा सैनिक करिअर अकॅडमी च्या प्रांगणामध्ये लोकांनी अनुभवली
त्यांच्या नावाने दरवर्षी अनेक अनेक उपक्रम शहीद योगेश दराडे सैनिक मित्र फाउंडेशन करत असते  रक्ताच्या थेंबा थेंबातून श्रद्धांजली देऊन अनेक रक्तदान शिबिरे घेतली मुलांच्या भरती मॅरेथॉन घेतल्या क्रिकेटच्या प्रीमियर लीग घेतल्या कॅन्डल मार्च काढून देशभक्तीचे प्रतिक प्रेरणा मुलांच्या हृदयात जागवली व आज मांडव्यातील शेकडो जवान सैन्यात सीमेवर तैनात आहे सैनिकाचे गाव म्हणून मांडवा गावची ओळख झाली आहे व सर्वोच्च मानाचे स्थान शहीद योगेश ने पटकावले आहे त्याचा गावाला परिवाराला अभिमान आहे यावर्षी आठव्या स्मृतिदिनानिमित्त सायंकाळी गावात कॅण्डल मार्च काढून  भारत माता की जय जय जवान जय किसान अमर रहे अमर रहे योगेश दराडे अमर रहे वंदे मातरम च्या देशभक्ती घोषणांनी आसमान दुमदुमून गेला व शिव मंदिरामध्ये हरिभक्त पारायण सुनील महाराज गाडेकर यांचे शहीद पर कीर्तन झाले प्रसंगी ह भ प सतीश महाराज डोईफोडे व त्यांचे टाळकरी मंडळ मांडवा गावातील सर्व सैनिक मित्र अरुण नागरे पवन मोरे समाधान गव्हाणे गणेश पवार ज्ञानेश्वर नागरे श्रीकांत नागरे भगवान गव्हाणे किरण जाधव श्रीनिवास दराडे शरद नागरे बालू गुरुकुल जगदीश तारे कैलास लोढे वैभव तारे अमोल गोरे  नितीन वनवे हनवत खेड भीमराव चाटे मेहुना राजा विलास कायंदे बायगाव श्रीहरी तारे जालना मित्रांनी प्रत्येक वर्षी शहीद योगेशच्या नावे उपक्रमाची परंपरा चालू ठेवण्याची शपथ घेतली प्रसंगी वीर माता पिता वीर पत्नी यांनी सर्वांचे आभार मानले जय हिंद
0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *