समर्थ कृषी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्री फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा आयोजीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी महाविद्यालयात आयोजित  कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी  स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे यावर मार्गदर्शन केले त्यानंतर प्रा.  अश्विनी जाधव  यांनी सावित्री माईच्या कार्यावर प्रकाश टाकत आधुनिक काळात शिक्षण घेत  असतांना संस्कृती व उत्तम विचार  व आचारांचे पालन करावे आणि शिक्षण व चांगल्या कार्याचा वसा सावित्री माई प्रमाणे पुढे न्यावा.  याप्रसंगी उपस्थित कृषी दूत आयुश येलने,आदित्य ठाकरे, तसेच कृषी कन्या साक्षी भालाधरे, पल्लवी डवरे, ऋतुजा वाघ आणि नेहा लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री शिंगणे आणि ऋतुजा बनकर व उपस्थितांचे आभार वैष्णवी गोळे यांनी केले या कार्यक्रमास रा. से. यो. सह. कार्यक्रम अधिकारी  प्रा. किरण ठाकरे, प्रा. वैभव देशमुख, प्रा. चारुदत्त जायभाये, प्रा. मंगेश धांडे , प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. शिवकन्या दरेकर, प्रा. सोनाली इंगळे, अर्चना जत्ती, सुवर्णा उमाळे आणि श्रीहरी काळुसे व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होेते.
0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *