मालेगांव मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आली माहीती .(मा जिजाऊ )सैय्यद इमरान मालेगांव राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव गेल्या ३ वर्षानंतर यावर्षी प्रथमच मोठ्या उत्साहात व लाखो जिजाऊ – शिव भक्तांच्या उपस्थतीत १२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे साजरा होत आहे . या सोहळ्याला बघण्यासाठी व जिजाऊंना वंदन करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील हजारो मावळे मातृतिर्थाकर हजेरी लावणार आहेत . अशी माहीती मराठा सेवा संघाच्या वतिने देण्यात आली आहे .
एक नव्हे तर दोन छत्रपती घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ या जगातील एकमेव माता आहेत . त्यांनी दोन छत्रपती छत्रपतींनाच घडविले नाही तर स्वतः त्या सुद्धा प्रचंड कर्तृत्ववान होत्या . शस्त्रविद्या , राज्यशास्त्र , समाजशास्त्र आदी विषयात त्या पारंगत होत्या . म्हणुनच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे जेंव्हा औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे गेले होते तेंव्हा त्यांच्या अनुपस्थितीत जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार अत्यंत चोख सांभाळला होता . व या काळात काही किल्ले जिंकुन स्वराज्यात सामील करून घेतले होते . अशा या मातेच्या जन्मदिनी मराठा सेवा संघाच्या वतीने मातृतीर्थावर जगातील लाखो अनुयायांच्या उपस्थीती मधे जिजाऊ जन्मोत्सव गेल्या 30 वर्षापासून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो . मागील दोन वर्षांपासून कोराना च्या संकटामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता . परंतु यावर्षी पुन्हा मोठ्या जोमाने व प्रचंड उत्साहात हा सोहळा १२ जानेवारी रोजी साजरा होत आहे .
परीवर्तनवादी विचारांच्या पुस्तकांचे सुमारे ५०० स्टॉल , अनेक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन , दैनिकांच्या पुरवण्यांचे विमोचन , नवोदित वक्त्यांची भाषणे , शाहीरांचे पोवाडे , सामुहिक विवाह सोहळा , आदी सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवधर्म पिठावर युगनायक अॅड पुरुषोत्तम खेडेकर साहेब व राज्यातीलच नव्हे तर देशातील विचारवंतांच्या विचारांची शिदोरी येथे मिळणार आहे . या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी प्रत्येक गावागावातील शिवरायांचे मावळे तयार झाले असुन वाशिम जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने ते उपस्थीत राहणार आहेत . असे यावेळी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड व अन्य ३३ कक्षांच्या वतिने माहीती देण्यात आली
Users Today : 25