मोहाचा पाडा केंद्र शाळेच्या क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर येथे संपन्न झाल्या.!!!

Khozmaster
1 Min Read

पालघर प्रतिनिधी:सौरभ कामडी केंद्र स्तरीय एक दिवसीय क्रीडास्पर्धा मोहाचा पाडा अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषद शाळा यांच्या पार पडल्या.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा झाप ग्रामपंचायत सरपंच एकनाथ दरोडा यांच्या उपस्थिती पार पडला .या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून झाप ग्रामपंचायत कडून विजेता संघ व उप विजेता संघाला व वयक्तिक स्पर्धकाला ही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले.यावेळी झाप सरपंच एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की लहान स्पर्धेतून च खेळाडू घडत असतो. या वयातच खेळाडूला आपल्या कलागुणांना वाव देत येतो आणि विद्यार्थ्याचे मनोबल वाढावे व आपण स्पर्धा जिंकलो आहोत याचे काहीतर प्रतीक म्हणून आम्ही या वर्षी विजेत्याला ट्रॉफी दिल्या .दरवेळी या स्पर्धा आयोजित होतात परंतु जिंकलेल्या संघाला काही बक्षीस म्हणून दिले जात नव्हते त्यामुळे विद्यार्थ्याला तोंडी सांगावे लागत होते की आम्ही जिंकलो म्हणून आम्ही या वर्षी हा निर्णय घेतला.यावेळी मोहाचा पाडा केंद्राचे केंद्र प्रमुख शेंडे सर,वाघ सर खाल्ले सर व सर्व शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक , नांदगाव उप सरपंच कैलाश गांगड,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी,संतोष भला,माजी सरपंच संजय भला,काशिनाथ दरोडा,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय वारा , व खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *