शासनातर्फे आमदार संजय गायकवाड, प्रशासना तर्फे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या हस्ते लेखी पत्र प्राप्त..
22 जानेवारी पर्यंत आंदोलन स्थगित…
अन्यथा 23 जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ
महिलांचा आक्रोश मोर्चा…. सुरेखाताई निकाळजे. बुलढाणा: जळगाव जामोद येथील नाबालिक मुलीचे अपहरण प्रकरणात आमदार संजय कुटे आणि त्यांच्या ड्रायव्हरचे नाव समोर आल्यामुळे थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार संजय कुटे यांच्या मैत्रीचे फलक लावत गृहमंत्री फडणवीस यांना खुले आवाहन उपोषण मंडपातून झाल्यामुळेच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. तर आमरण उपोषणाची दखल घेत गृह मंत्रालयाकडून जिल्हा पोलीस प्रशासनाला आदेशित केल्याचे समोर येत आहे.मागील पाच दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची कोणतेही दखल न घेणाऱ्या पोलीस प्रशासनाने अखेर सहा जानेवारीला रात्री उशिरा उपोषणकर्त्या पीडीत मातापित्यांच्या सर्व मागण्यांची पंधरा दिवसात पूर्तता करण्याचे लेखी पत्र देण्याची हिंमत केली.मागण्यांची पूर्तता करण्याचे पत्र शासनातर्फे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, प्रशासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, जिल्हाधिकारी कार्यालय गृह विभागाचे अधीक्षक करे,ठाणेदार चंद्रकांत काटकर आदींनी उपोषण मंडपात येऊन सादर केले.पंधरा दिवसात मुलीला वापस आणून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे लेखीआश्वस्त केले.त्यामुळे सहा जानेवारीला रात्री उशीरा आमरण उपोषण आंदोलन 22 जानेवारी पर्यंत स्थगित केले आहे. पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यास 23 जानेवारी रोजी महिला संघटनांच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ महीलांचा आक्रोश मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर आणून निवेदन सादर करण्यात येईल. असा इशारा यावेळी आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे यांच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी उपोषण कर्ते पीडित माता-आजी, बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाध्यक्ष ओमसींग राजपूत,आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अँड.सतीशचंद्र रोठे, शेख सईद, सुरेखाताई निकाळजे, संजय एंडोले,गजानन झांबरे, वर्षाताई ताथरकर, सुमनताई राजपूत, आशाताई गायकवाड, सिंधुताई अहिर, इमरान शाहा, सय्यद युसुफ, परवीनबी गुलाब शाहा, कुर्बान शाहा यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Users Today : 39