हिटलर .

Khozmaster
1 Min Read

हिटलर .

 

सहज ओढले जाता

विवादात अजाणता

प्रसिध्दपुरूषो भवेत

चांगले तुम्हीजाणता

 

आपल्या या वादात

महापुरूषां आणता

तुटूनि जाणारं रबर

कितीजोरात ताणता

 

कान विसरून जाता

माझेचं खरे म्हणता

लोकशाहीत हिटलर

राजे स्वतास जाणता

 

दुस-यास दोष देता

कबरआपली खणता

मनातचं दुर्धर व्याधी

उगाच कसे कह्णता

 

सरडा प्रिय आपणा

रूपे केवढी बदलता

कळेना का मुखवटा

चेहरा खरा कोणता

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996..

 www.kavyakusum.com

0 9 4 2 4 3
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *