वाशिम प्रतिनिधी ; वाशिम: ‘रिझिंग डे’ सप्ताह निमित्त राजा प्रसेनजित संस्था व विद्यार्थी भारती संघटना यांच्या वतीने श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे तथा ह्युमन वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक प्रा.डॉ. प्रसेनजित चिखलीकर,युवा सामाजिक कार्यकर्ते तथा राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था सदस्य तथा माझी राष्ट्रीय युवा कोर प्रदिप पट्टेबहादुर यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशन ला भेट देऊन वृक्षारोपण व वृक्ष,आकर्षक अशी भारतीय राष्ट्रध्वज प्रतिमा पोलीस निरीक्षक रफिक शेख यांना भेट दिली. यावेळी (API) रामाकांत खंडारे डी.बी पथक वाशिम उपस्थित होते.
यावेळी समाजकार्याचे अक्षय नवघरे, अशांत कोकाटे, विजयकुमार राऊत, सदानंद पट्टेबहादूर,संदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.देशाच्या व जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना आणि आजवर्ती सर्व पोलिस दलातील आधिकरी व पोलिस कर्मचारी यांनी केलेल्या कार्य बद्दल या महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन,रिझिंग डे सप्ताहाच्या निमित्त खूप खूप अभिनंदन केले. तथा त्यांच्या पुढील कार्यसाठी शुभेच्छा दिल्या.२
जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस स्थापन दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला व तोच दिवस पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने २ ते ७ जानेवारी दरम्यान ‘रिझिंग डे’ हा सप्ताह अनेक शाळा-महाविद्यालयात, सामाजिक संस्था व ग्रामीण भागात विविध कार्यक्रम पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित केले जातात. या सप्ताहात विद्यार्थ्यांना नागरिकांना कायदेविषयक आणि स्वरक्षणाविषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा मानस असतो. यावेळी २ जानेवारी ते ७ जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन व रेझिंग डे’ सप्ताह निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पट्टेबहादूर व मित्र मंडळ यांनी केले होते. तर यावेळी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मा.रफिक शेख साहेब व ए.पी.आय. रमाकांत खंडारे यांनी या कार्याचे कौतुक केले.
रिझिंग डे’ सप्ताह निमित्त वाशिम शहर पोलीस स्टेशनला वृक्ष व भारतीय राष्ट्रध्वज प्रतिमा सस्नेह भेट.
0
9
3
7
1
9
Users Today : 25
Leave a comment