कविता

Khozmaster
1 Min Read

कविता 

किती ठेविल्या कोनाडी

सुपा येवो आबादानी

धनधान्य उतरंडी

कणग्यांची ही कहाणी ।।धृ।।

हाता -तोंडी येई घास

पोट भरो आनंदानी

आली ढेकराची रास

घरोघरी आबादानी।।१।।

एक हात दोर पुरे

पाणी तुडुंब विहीरी

गमे भलते शिवारी

मोट चाले आनंदानी।।२।।

शिको शिक गळाभरी

झेला हाती झेलकरी

किती अवघड जरी

आंबा उतरवी हरी।।३।।

आला मिरग मिरग

सदा शेती-कामी दंग

पुजा करी तो मिरग

 बीजांकूर औत ओती।।४।।

अन्नपुर्णा माझी माता

धान पाखडा पाखडा

निट- निटके निवडा

सुपा येवो आबादानी ।।५।।

कवी:-द.रा.गोसावी.

“कमलाई”आनंद नगर

खामगाव जि बुलढाणा.

पिन को:-४४४३०३

मो.नंबर:-७०२०००७१८०

0 9 4 2 4 4
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *