जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटा येथे बाल आनंद मेळावा..!!

Khozmaster
2 Min Read

शाळेतील विद्यार्थ्यांनी लावली विविध साहित्याची दुकाने..दिपक मापारी, रिसोड रिसोड तालुक्यातील घोटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यातर्फे कमाई सप्ताह अंतर्गत बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापक सुधीर सरकटे सर यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.गजानन मोरे व सदस्य, यांची उपस्थिती होती. विद्यार्थी दशेतच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान वाढावे स्वतः परिश्रम करून विविध पदार्थ तयार करून ते विकून चार पैसे कसे कमवावे याचे अनुभव म्हणून सर्वत्र कमाई सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. असताना या अंतर्गत रिसोड तालुक्यातील घोटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन. मुख्याध्यापक सुधीर सरकटे सर, यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होता.या बाल आनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थासह विविध वस्तूचे स्टॉल लावले होते. तरी यावेळी त्यांनी साहित्य विक्रीचा अनुभव जाणून घेतला होता या आनंद मेळाव्याला गावातील पालक वर्गाने भेटी देऊन बालकाचा उत्साह वाढविला होता. शाळेतील विद्यार्थिनी या आनंद मेळव्यातून लावण्यात आलेल्या विविध स्टॉलवर साहित्याची विक्री करून व्यवहार कसा करावा याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला..हा तर कार्यक्रम शाळेतील शिक्षकांनी घडवून आणला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. बाल आनंद मेळाव्याला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक – सुधीर सरकटे सर, प्रमोद पवार सर, अमोल बिल्लारी सर, तानाजी बिल्लारी सर, अमित भुजबळ सर,यांनी विशेष परिश्रम घेतले होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला..

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *