कल्पेश खुरकुटे यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम संपन्न.

Khozmaster
2 Min Read

पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी प्रहार जनशक्ती पक्ष व मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व पॅरामेडिकल कॉलेज जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी कल्पेश खुरकुटे प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार तालुका सचिव यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त पतंगशाह कुटीर रुग्णालय जव्हार येथे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पॅरामेडिकल कॉलेज जव्हार येथे सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व युवा दिनानिमित्त त्याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करून प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे संपर्कप्रमुख व पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला, त्यानंतर पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तकेंद जव्हार येथे हितेश जाधव प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे संपर्क प्रमुख, पालघर जिल्हाध्यक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार तालूका सचिव कल्पेश खुरकुटे यांनी स्वतः रक्तदान करून शिबीराला सुरवात केली असून दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३५ रक्तदात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले असून यामध्ये बहुतेक रक्तादात्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले असून महिलाभगिनी,मित्र परिवार व प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरातुन आपला व आपल्या प्रियजनांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा करा असा संदेश दिला.त्याचबरोबर पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान हेच श्रेष्ठ दान असा संदेश दिला.सदर कार्यक्रमादरम्यान पतंगशाह कुटीर रुग्णालयातील रुग्णांना केळी व सफरचंद चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मराड, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत राजगुरु, यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर शिबिराकरिता रक्त केंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कविराज भोये डॉ.सचिन महाले ,रक्त केंद्र वैज्ञानिक अधिकारी श्रीराम धुरी,समुपदेशक स्वप्निल कौठळकर,रक्तकेंद्र परिचर विश्राम वाढू यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष मनोज कामडी, उपाध्यक्ष किशोर वाघ, प्रसिद्धीप्रमुख दिनेश आंबेकर, अक्षय भडांगे , अंकुश खरपडे ,प्रहार अपंग क्रांती संस्था जव्हार तालूका जयेश मोरघा,तसेच प्रहार जनशक्ती पक्ष मोखाडा तालुका अध्यक्ष सुरेश वाघ व प्रहार अपंग क्रांती संस्था वाडा तालुका अध्यक्ष संतोष निखुर्डे ,उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व पॅरामेडिकल कॉलेज जव्हार येथील संचालक, मातोश्री शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *