वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम 13/01/2023 रोजी मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांनी वाशिम नगरपरिषद कार्यालयास अभ्यास भेट दिली. या भेटीदरम्यान नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच नगराध्यक्ष , उपाध्यक्ष व विविध समित्यांचे सभापती यांच्या कार्यालयास ही भेट दिली.नगरपरिषदेचे प्रशासन त्यामध्ये असणारे महत्त्वाचे विभाग या सर्व विभागांना विद्यार्थ्यांनी भेट देऊन नगरपरिषदेचे कामकाज कसे चालते याची माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान नगरपरिषदेतील पाणीपुरवठा, विभाग, कर विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग बांधकाम विभाग, नगर रचना विभाग,शिक्षण विभाग, नागरी सेतू सुविधा विभाग अशा विविध विभागांना भेटी देऊन नगरपरिषदेच्या कार्याचा आढावा घेतला या भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्षरीत्या नगरपरिषद प्रशासनाचे कार्य कसे चालते यासंदर्भात ही माहिती मिळाली या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना नगरपरिषद कार्यालयातील नगररचना विभागाच्या रश्मी हलगे मॅडम यांनी मार्गदर्शनही केले. लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ.विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन विषयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 25