शहाद्यात ३ ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखांचे फलक अनावरण
प्रविण चव्हाण
नंदुरबार :- पक्षाच्या माध्यमातून समाजाची सेवा करून नागरिकांच्या उन्नतीसाठी सर्व कार्यकर्ते एकत्र आल्यास एक चांगलं वातावरण निर्माण होईल.
आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून राजकारण करायचे नाहीये. बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज आहे. असे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
शहादा शहरातील वीर सावरकर चौक,एकता चौक, कुकडेल येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखांचे फलक अनावरण माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जि.प माजी उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी होते.यावेळी नंदूरबार पालिकेचे माजी नगरसेवक परवेज खान,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पेंढारकर,कृष्णदास पाटील,भानुदास पाटील, शहादा तालुकाप्रमुख राजू पाटील,नंदूरबार तालुका प्रमुख रवींद्र गिरासे,माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी,शहर प्रमुख रोहन माळी,शहादा युवा सेना शहर प्रमुख सागर चौधरी, फिरोज मेमन,नंदूरबार महानगर प्रमुख विजय माळी आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आ.रघुवंशी म्हणाले,कोणताही पक्ष नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांसाठीच काम करत असतो.बाळासाहेबांची शिवसेना फक्त नगरपालिका निवडणूकीपुरता काम करणार नसून,पक्षाच्या माध्यमातून समाजाची सेवा करून नागरिकांच्या उन्नतीसाठी कार्य करणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांसोबत आहेत. त्यामुळे अपूर्ण राहिलेले विकासाची कामे पूर्णत्वास येतील.भविष्यातील शहरातील सर्वच विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कार्यकर्त्यांनी पक्षा सोबत राहून कार्य करावे. पक्ष मोठा झाल्यावरच कार्यकर्ता मोठा होईल.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीर सावरकर शाखा प्रमुख सुनील पाटील,उपप्रमुख नारायण सोनार, सचिव योगेश मराठे सहसचिव रूपक मराठे, खजिनदार विजय तांबोळी, सल्लागार संतोष गवळी, एकता चौक शाखाप्रमुख मोईन मेहतर उपप्रमुख अल्ताफ खान,सचिव परवेज किंग, सहसचिव ताहीर मुंडा,खजिनदार इमरान शेख,सल्लागार अरबाज खान, कुकडेल शाखाप्रमुख वसीम अन्सारी, उपप्रमुख वसीम अन्सारी, सचिव शोएब सैय्यद, सहसचिव सोहेल तेली, खजिनदार नविद अन्सारी, सल्लागार हाशिम बेलदार यांनी प्रयत्न केले.
Users Today : 30