प्रविण चव्हाण
नंदूरबार :-विसरूनी सारी कटूता नात्यात तिळगुळाच्या गुडवा यावा अशा शुभेच्छा देत एकमेकांच्या साथीने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या डोममध्ये माजी नगराध्यक्ष.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून हळदी कुंकवाच्या आनंदाचा सोहळा उत्साहात रंगला.
मकर संक्रांति निमित्त दरवर्षी नगराध्यक्ष सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या संयोजनातून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु,मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कार्यक्रम झाला नव्हता.यंदा मकर संक्रांतीचे सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे.रविवारी सायंकाळी शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या डोम मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,मेघा राम रघुवंशी,माजी नगरसेविका मनीषा वळवी, ज्योती पाटील,सोनिया राजपूत,स्मिता दिघे,भारती राजपूत,भावना गुरव,जागृती सोनार,राष्ट्रीय शहरी उपजीविका व्यवस्थापक मानसी मराठे यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू दिला.
Users Today : 30